किनवट/प्रतिनिधी: अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाची त्वरित करण्यात यावे अशी मागणी किनवट/माहूर तालुक्यातील सकल मातंग समाजाने केली आहे. या मागणीसाठी समाजाच्या वतीने दिनांक 28 मार्च 2025 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हालचालींना वेग आला आहे.
देशातील सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयानुसार अनुसूचित जाती मध्ये उपवर्गीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने त्वरित कार्यवाही करत उपवर्गीकरणाचा आराखडा तयार करावा आणि त्याची अंमलबजावणी करावी अशी ठाम भूमिका मातंग समाजाने मांडली आहे.
निवेदनावर के मूर्ती, शेकन्ना गुंडावार, मारुती सुकलवाड' भगवान मारपवार, रामलू कोतुरवार, बालाजी बटूर, रवी तोडकुलवार, तुकाराम मस्सीदवार, नागनाथ भालेराव, लक्ष्मीपती दोनपेलीवार, गंगाधर मुकनेपेल्लीवार, रमेश दिसलवार शिवना कलगोटवार,स्वामी नुत्तपेल्लीवार,अतिष काळे,नारायण सांगळे, धनाजी बसवंते, दिगंबर लोखंडे,प्रमोद पेटकुले,राज माहुरकर, डी एन बटूर, रवी दिसलवार, गंगाधर तोटरे,आदी च्या स्वाक्षऱ्या आहेत.