Ticker

6/recent/ticker-posts

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*



*क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेले प्रतिनिधित्व  देण्यासाठी आरक्षनाचे उपवर्गीकरन करून त्याची अंमलबजावणी आज पासून करीत तेलंगाना सरकारने या दोन्ही महामानवाना खरी आदरांजली अर्पण केली.*
  डॉ अंकुश गोतावळे
  राज्यसमन्वयक- सकल मातंग समाज

जिवती:- काल दि 14/4/2025 ला मौजा लहुगड येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती च्या निमित्ताने सामाजिक न्याय पंधरवाडा उपक्रमाअंतर्गत  जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक न्याय पंधर वाडा निमित्ताने गावोगावी जाऊन महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी समाजामध्ये करून स्वाभिमानी समाज निर्माण करण्याचा मानस आयोजकांचा आहे.सोबतच 20 मे 2025 रोजी आझाद मैदान मुंबई येथे आयोजित आरक्षण उपवर्गीकरण जनआक्रोश आंदोलनाची प्रसिद्धी करून जास्तीतजास्त लोकांनी उपस्थित राहावे यासाठी आवाहन केले जात आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ अंकुश गोतावळे तर मार्गदर्शक म्हणून श्री रमाकांत जंगापल्ले श्री दीपक गोतावळे सर, श्री विजय गोतावळे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री देविदास कांबळे सर यांनी सूत्रसंचालन श्री बालाजी वि. वाघमारे सर यांनी तर आभारप्रदर्शन ऍड किशोर तोगरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी पलमेटे,लक्ष्मण तोगरे, ज्ञानोबा तोगरे, पंढरी वाघमारे, ऍड नागनाथ कांबळे,बालाजी ग. वाघमारे,बालाजी मा. वाघमारे, बालाजी कांबळे, नारायण सूर्यवंशी, केशव पलमेटे, संदीप ढोबळे, रमेश पलमेटे, श्रीरंग शिकारे, विकास मोतेवाड,देवराव शिकारे, भागोजी केंद्रे,दत्ता शिकारे सर, सतीश तोगरे यांनी परिश्रम केले.

Breaking News

कॉम्रेड यादवराव गायकवाड यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन!*