Ticker

6/recent/ticker-posts

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिवाळीच्या दिवशी साईनाथ महाराजांनी दिली वस्त्र अन्नधान्याची भेट


श्रीक्षेत्र माहूर


 माहुर तालुक्यातील पाचुंदा येथे शेतकरी गौतम किसन पाटील यांची कर्जबाजारीपणा व नापीकीला कंटाळून आत्महत्या केली होती सदरील दुखद घटनेमुळे परिवारासह गावावर शोक कळा पसरली होती घटना कळतात माहूर येथील आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधीश राष्ट्रसंत तथा राज्याचे स्वच्छता दूत ब्रँड अँबेसिडर साईनाथ महाराज वसमतकर यांना कळतात त्यांनी दि 21 रोजी दिवाळीच्या दिवशी मौजे पाचुंदा येथे जाऊन पाटील परिवाराला वस्त्र अन्नधान्याची किट दिली


माहूर तालुक्यातील अति दुर्गम भागात असलेल्या मौजे पाचुंदा येथील गौतम पाटील यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती त्यामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना साईनाथ महाराज वसमतकर यांना ही बाब कळल्याने त्यांनी तात्काळ मौजे पाचुंदा गाठून पाटील परिवाराच्या सदस्यांना वस्त्र आणि अन्नधान्य देऊन धीर दिला


यावेळी साईनाथ महाराज वसमतकर यांनी सांगितले की दुःखी, कष्टी,रोगी, अनाथ व अपंग निराधार यांची सेवा करावी त्या सेवेतूनच परमेश्वराचे दर्शन होऊन संसार सुखी होइल असे सांगितले दिवाळीच्या दिवशीच साईनाथ महाराजांनी गावात भेट देऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबाला धीर दिल्याने गावकऱ्यांनी महाराजांचा हृदय सन्मान केला यावेळी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याची  पत्नी अनिता गौतम पाटील, आई कोंडाबाई किसन पाटील,मुले वैदिक पाटील, वर्षभ पाटील, भाऊ अमृता पाटील, महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष शेषराव पाटील, पत्रकार पंडित धुप्पे, अनिल सुरोशे, विशाल डोईफोडे यांचे सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा