एक कोटीचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द
श्रीक्षेत्र माहूर
महाराष्ट्रात राज्यात पावसाळ्यात अतिवृष्टी पुराचे पाणी यासह इतर कारणांनी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते यासाठी शेतकऱ्यांना नागरिकांना मदत व्हावी म्हणून माहुर गडावरील श्री रेणुका देवी संस्थान कडून मुख्यमंत्री सहायता निधीत एक कोटीचा निधी देण्याची जाहीर करण्यात आले होते या अनुषंगाने रेणुका देवी संस्थानचे कार्यकारी मंडळ आणि विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी नागपूर येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन एक कोटीचा धनादेश दि 20 रोजी त्यांचे सुपूर्द केल्याने श्री रेणुका देवी संस्थानच्या कार्यकारी मंडळ विश्वस्त मंडळाचे अभिनंदन होत आहे
श्री रेणुकाची संस्थान मंदिरात आल्यानंतर भाविकांना सुविधा सुरक्षा मिळाव्यात भाविकांना आनंदात दर्शन घेता यावे यासाठी श्री रेणुका देवी संस्थान दिवसेंदिवस गडावर सुविधात वाढ करत आहे तसेच अनेक वेळा शाळा अंगणवाड्या यासह भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये मदतीचा हात पुढे करत असल्याने दिवसेंदिवस रेणुका श्री रेणुका देवी संस्थानच्या नावलौकिकात भर पडत असताना या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी चा पाऊस पुराचे पाणी महापूर यासह अनेक कारणांनी नागरिक शेतकरी बेजार झाले होते त्यामुळे श्री रेणुका देवी संस्थान च्या कार्यकारी मंडळाने निर्णय घेत एक कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याची घोषणा केली होती सदरील मदत निधीचा धनादेश कार्यकारी मंडळ विश्वस्त मंडळांनी नागपूर येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे जमा केला
श्री रेणुका देवी कार्यकारी मंडळ आणि विश्वस्त मंडळांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन श्री रेणुका देवी संस्थान माहूरगड यांच्या मार्फत श्रीमती आनंदी विकास आणि त्याच्या सहकारी यांनी संगीत बद्ध केलेली संतकवी विष्णुदास यांची काव्ये "माहूरगडाची माय रेणुका" या शीर्षकाखाली अधिकृत रीत्या अनावरण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी कार्यकारी मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंतूलां उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप विश्वस्त तथा मुख्य पुजारी चंद्रकांत भोपी संजय कान्नव विनायकराव फांदाडे आशिष जोशी बालाजी जगत अरविंद देव दुर्गादास भोपी व्यवस्थापक योगेश साबळे चालक विलास शेडमाके यांचे सह मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप यांच्याकडून माहूरगडावरील विकास कामे आणि पीक नुकसानी बाबत सविस्तर माहिती जाणून घेतली
