Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथे सर्वधर्मीय विधवा, विधुर, परीतक्त्या, घटस्फोटीत व दिव्यांग वधू वर परिचय मेळावा दिनांक 27 एप्रिल रोजी कलावती गार्डन किनवट येथे संपन्न

किनवट: किनवट येथे सर्वधर्मीय विधवा, विधुर, परीतक्त्या, घटस्फोटीत व दिव्यांग वधू वर परिचय मेळावा दिनांक 27 एप्रिल रोजी कलावती गार्डन किनवट येथे संपन्न झाला.
   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती बेबीताई प्रदीप नाईक या होत्या तर कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षा म्हणून सौ सागरताई शिंदे या होत्या.
 या मेळाव्यामध्ये आज 100 च्या जवळपास  वधू वरांनी परिचय दिला. तसेच एक विवाह सोहळा ही संपन्न झाला. 
 या मेळाव्यात समाजातील उपेक्षित गरजू निराधार आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिला व पुरुष होती.
   विधवा, विधुर, घटस्फोटीत व दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी योग्य जुळवणीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते.
 सदरील कार्यक्रमास 11 अकरा वाजता सुरुवात झाली सर्व प्रतिष्ठित पाहुणेमंडळीची आयोजकाच्या वतीने शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
   दुपारी 1 वाजता स्वादिष्ट भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
 दुसऱ्या सत्रात दुपारी दोन वाजता विधवा महिलांना सड्याची वाटप करण्यात आले. तसेच विवाहित नववधूस मनीमंगळसूत्राचे व जोडवी चे वाटप करण्यात आले.अल्पावधीतच महाराष्ट्रभर प्रचार झाल्यामुळे  कोल्हापूर, पुणे,यवतमाळ, बुलढाणा, वाशिम,घाटंजी लांबच्या ठिकाणाहून मुलं मुली  परिचय देण्यासाठी मेळाव्यात आले होते, दिव्यांग मध्ये मूकबधिर यांनी सुद्धा आपला सहभाग या मेळाव्यात नोंदवला, या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम संपूर्ण वर्षभर राबविण्यात येणार आहे आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसेच महिला उत्कर्ष सेवाभावी संस्था यांच्या वतीने या मेळाव्यात जमलेली लग्न वर्षभर ज्यांच्या ज्यांच्या संस्कृती समाजा नुसार संस्थेच्या वतीने मोफत लावण्यात येतील, असे आयोजिका प्राध्यापक जयश्री भरणे यांनी मेळाव्यात सांगितले, तसेच आयोजिका प्रीती मुनेश्वर  यांनी महिलांना शिलाई मशीन व ब्युटी पार्लर च्या प्रशिक्षणाचे फॉर्म मोफत भरून घेतले, संस्थेच्या वतीने महिलांना 100 साडी वाटप झाले
 सदरील कार्यक्रमास किनवटचे माजी नगराध्यक्ष के मूर्ती, व्यंकटराव नेमानेवार, साजिद खान, अभय महाजन, माजी काँग्रेस अध्यक्ष नारायणराव सिडाम, दीपक ओंकार, आदींनी वधू-वरास शुभेच्छा दिल्या व उपस्थिताना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पहुरकर,आनंद भालेराव, फुलाजी गरड, किरण ठाकरे,नसीर तगाले,शेख अतिफ,गंगाधर कदम आशिष शेळके,भगवान माडपेल्लीवर आदी उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे सुरेख संचालन श्री उत्तम कानिंदे सर यांनी केले.
सदरील कार्यक्रमाचे आयो जयश्री भरणे, प्रीती मुनेश्वर,पुष्पा नगराळे यांनी केले होते 

 

Breaking News

कॉम्रेड यादवराव गायकवाड यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन!*