Ticker

6/recent/ticker-posts

संभाजी ब्रिगेडच्या विधानसभा अध्यक्षपदी पांडुरंग बादड संघटक पदी विक्रम पवार प्रसिद्धी प्रमुखपदी आकाश इंगोले यांची निवड

 नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून स्वीकारला पदभार



किनवट प्रतिनिधी :


किनवट : शंभर टक्के राजकारण शंभर टक्के समाजकारणाचा वसा घेऊन महामानवांच्या विचारधारेवर चालणाऱ्या संभाजी ब्रिगेड पक्षाने सदैव शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर राहणाऱ्या संभाजी ब्रिगेड पक्षांमध्ये युवकांनी आता संभाजी ब्रिगेडची कास धरली आहे.संभाजी ब्रिगेड पक्षांमध्ये विचारधारा असून संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रातले तंटे मिटून हातात लाटीकटीच्या ऐवजी पुस्तक देऊन मस्तक सुधारण्याचं काम या पक्ष संघटनेने केले आहे.यामुळेच संभाजी ब्रिगेड पक्षांमध्ये नवयुवकांची विचारांची फौज निर्माण होत आहे.काल नांदेड येथे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ही करण्यात आल्या यात संभाजी ब्रिगेडच्या किनवट माहूर विधानसभा अध्यक्षपदी पांडुरंग बादड विधानसभा संघटक पदी विक्रम पवार प्रसिद्धी प्रमुख पदी आकाश इंगोले यांची बहुमताने निवड करून विभागीय अध्यक्ष संकेत पाटील जिल्हाध्यक्ष कमलेश पाटील कदम जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे यांच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन त्यांची पदावर नियुक्ती करण्यात आली आली.


यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संकेत पाटील जिल्हाध्यक्ष कमलेश पाटील कदम जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे जिल्हा सचिव बालाजी पाटील सिरसाट किनवट तालुकाध्यक्ष सचिन पाटील कदम शहराध्यक्ष सुमित पाटील माने,हदगाव तालुकाध्यक्ष किरण पाटील वानखेडे अंकुश कोल्हे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

संभाजी ब्रिगेडच्या विधानसभा अध्यक्षपदी पांडुरंग बादड संघटक पदी विक्रम पवार प्रसिद्धी प्रमुखपदी आकाश इंगोले यांची निवड