Ticker

6/recent/ticker-posts

भारत जोडो युवा अकादमी संचालित साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, MIDC, कोठारी ता. किनवट येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या नेत्र रोग तपासणी आणि उपचार शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 


किनवट : भारत जोडो युवा अकादमी संचालित साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, MIDC, कोठारी ता. किनवट येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या नेत्र रोग तपासणी आणि उपचार शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


सदर भव्य मोफत नेत्र तपासणी  शिबिर दि. 28 मार्च २०२६ रोजी हॉस्पिटलचे संचालक मा. डॉ. अशोक बेलखोडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या शहरात जावे लागू नये, या उद्देशाने त्यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.



या शिबिरामध्ये आर्णी येथील सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ. तेजस केशववार यांच्यासह त्यांचे सहयोगी सिद्धेश केशववार, सोनल दासरवार, कोमल बोबडे  साने गुरुजी इमर्जन्सी अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मधील स्त्रीरोग तज्ञ डॉ. भाग्यश्री बेलखोडे - वरटकर, डॉ. योगेंद्र वरटकर, डॉ. दुर्गा काकडे, डॉ. विद्या गोलकोंडावार, डॉ. शिवानी बेलखोडे यांनीही शिबिरात सहभाग नोंदवला.


शिबिरामध्ये मोतीबिंदू, काच बिंदू, डोळ्यातील तिरळेपना, चष्माचे नंबर आणि शस्त्रक्रिया गरजू रुग्णांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले.


या शिबिरामध्ये एकूण 55 रुग्णांची तपासणी केली असता त्यामध्ये 26 रूग्ण  शस्त्रक्रियेसाठी पात्र झाले आहेत आणि 13 रुग्ण यांना चष्म्याचे नंबर काढून दिले आहेत.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा गित्ते शिबिरांचे प्रास्तविक डॉ .विद्या गोलकोंडावार यांनी  केले, तर आभार प्रदर्शन अजय जाधव यांनी केले.


नेत्र शिबिर यशस्वी करण्यासाठी साने गुरुजी इमर्जन्सी अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी यांचे  महत्वपूर्ण योगदान लाभले.