जिवती -19- चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उद्या दिनांक 20 मे 2025 रोजी मुंबई येथील आजाद मैदानावर आरक्षण उपवरगीकरणासाठी रवाना झाले आहेत गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाचे अनेक नेते कार्यकर्ते आरक्षण उपवर्गिकर्णसाठी लढत होते.अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने मोर्चे आंदोलने उपोषण सुरू होते.
परंतु या वेळीं सर्वच राजकीय नेते कार्यकर्ते पुढारी एकत्र येऊन सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या महामोर्चा साठी राज्यातून लाखो कार्यकर्ते मुंबई येथे दाखल होत आहेत. राज्याचे राज्य समन्वयक डॉ. अंकुश गोतावले यांनी जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्त्या सह लहुजी ब्रिगेड ची टीम घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत.