Ktnnewslive: आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आता रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या 20 मेला मातंग समाजाच्या वतीने मंत्रालयावर महाआक्रोष मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे
या मोर्च्यात लाखोंच्या संख्येने समाजबांधव सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनुसूचित जातींमधील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळावा, यासाठी आरक्षणाचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी मातंग समाज 20 मे रोजी लाखोंच्या संख्येने मुंबईवर महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या महाआक्रोश मोर्चाला मातंग समाजाने लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मातंग समाजातील सर्वपक्षीय व सर्व संघटनेच्या नेत्यांकडून करण्यात आले आहे.