Ktnnewslive:20 मे 2025 रोजी होणाऱ्या जन आक्रोश महाआंदोलन संदर्भात सकल मातंग समाज यांच्या वतीने राज्यस्तरीय बैठकीनंतर, लहुजी शक्ती सेना नांदेड जिल्हा यांच्या वतीने जिल्हास्तरीय बैठक आदरणीय विष्णू भाऊ कसबे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीस लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास दादा खंदारे, उपाध्यक्ष नारायणराव गायकवाड, राज्य संघटक नागोराव आंबटवार, महासचिव कैलास दादा थोरात, राज्य संपर्कप्रमुख नितीन दादा वायदंडे, पुणे शहराध्यक्ष दत्ताभाऊ धडे, नांदेड जिल्हाध्यक्ष प्रदीप भाऊ वाघमारे, जिल्हा संघटक माधव भाऊ वाघमारे, जिल्हा योगा अध्यक्ष प्रीतम भाऊ गावाले, राज्य कार्यकारणी सदस्य रविकांत भाऊ पवळे, डी. के. पवार, गंगाधर वाघमारे, माधव वाडेकर, मामा गायकवाड तसेच इतर अनेक कार्यकर्ते व लहू सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत आंदोलनाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि नांदेड जिल्ह्यातून भव्य प्रमाणावर सहभाग सुनिश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला.