संभाजीनगर: महाराष्ट्रातील मातंग संघटना प्रमुखांची दिनांक 5 जून 2025 रोजी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील सुभेदारी विश्रामगृहाच्या भव्यदिव्य स्वागत कक्षात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) चे जिल्हाध्यक्ष तथा मातंग क्रांती मोर्चाचे संयोजक संजयभाऊ ठोकळ हे होते.
या बैठकीत मुंबई, पुणे, नाशिक, नगर, लातूर, नांदेड, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, नागपूर, परभणी, हिंगोली, वाशिम, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) आदी जिल्ह्यातून संघटना प्रमुख व पदाधिकारी सहभागी झाले होते. बैठकीत खालील विषयावर चर्चा झाली:
1. आरक्षण वर्गीकरण होणार असलं तरी मातंग दलितांचं प्रत्येक मूल शाळेत गेलं पाहिजे, शिकल्यानंतर त्या प्रत्येक मुलाला संधी मिळाली पाहिजे यासाठी सामाजिक न्यायाचा लढा वृद्धिंगत केला पाहिजे.
2. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे.
3. अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून होत असलेली दिरंगाई यासंदर्भात आवाज उठवला पाहिजे.
4. अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था(आर्टी) कार्यान्वित करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून होत असलेला हलगर्जीपणा त्यातून होणारे मातंग विद्यार्थ्यांचे नुकसान यासंदर्भात सरकारला जाब विचारला पाहिजे.
5. न्यायमूर्ती बदर समितीचा निष्क्रिय कारभार संदर्भात राज्य सरकार आढावा घेत नाही त्याचे कारण विचारले पाहिजे.
6. क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशीच्या संदर्भात सरकारने तात्काळ नव्याने शासन निर्णय पारित करून अंमलबजावणी सुरू करावी.
7. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला ठरल्याप्रमाणे 1000 कोटी रुपये तात्काळ वितरित करण्यात यावेत आणि कर्जाची जामीन महाराष्ट्र शासनाने घ्यावी.
8. सकल मातंग समाजात घुसलेल्या काही स्वार्थी आणि सत्तालोलूप ठगांची हकालपट्टी करण्याच्या कृती कार्यक्रम राबवला पाहिजे.
9. होऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशनावर लेटर बॉंब आंदोलनाची तयारी केली पाहिजे.
10. सामाजिक न्याय दिनी 26 जून रोजी कोल्हापूर येथे गोलमेज परिषदेचे आयोजन करून आरक्षण वर्गीकरणाचा ड्रॉप छत्रपती शाहू महाजांच्या वारसांसमक्ष सादर झाला पाहिजे.
11. आरक्षण वर्गीकरण ब्ल्यू प्रिंट निर्मिती करून बदर समितीला आणि राज्य सरकारला सादर करावी.
12. मातंग समाजासाठी पिवळा झेंडा आणि त्या-त्या संघटनाचा विचारावर आधारित झेंडा असेल तर कुणीही कुणाचा तिरस्कार करणार नाही.
13. दरवेळी आंदोलने करून समाजाला वेठीस धरण्यापेक्षा कार्यकर्ते उभे करण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे.
14. कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग सुरू करून कायद्याचे प्रशिक्षण कार्यकर्त्यांना दिले पाहिजे.
15. लढाऊ कार्यकर्ते संघटित करून त्यांचे सक्षमीकरण करणे.
16. मातंग अस्मिता संगोपन व संवर्धन करण्यावर भर देणे.
17. उपजीविका आधारित गायरान, वन अर्थात जल, जंगल, जमीन विषय दुर्लक्षित होणार नाहीत याची काळजी घेणे.
या सह अनेक विषयावर सांगोपांग चर्चा झाली. राजकीय पक्षांच्या वळचणीला गेलेली मातंग चळवळ स्वयंपूर्ण बनवून ठरलेल्या लक्षाकडे घेऊन जाण्यासाठी पुढील काळात मुंबई विभाग, पुणे विभाग, कोकण विभाग, खानदेश विभाग, नागपूर विभाग, अमरावती विभाग आदी विभागात व्यापक बैठका आयोजित करून चळवळीत शिस्त निर्माण करण्याचे नियोजन करावे अशी चर्चा झाली आहे.
याप्रसंगी प्रा. डॉ. मिलिंद एकनाथ आवाड, संजय काशीराम इंचे, अशोकराव आल्हाट, कॉ. जितेंद्र गायकवाड, डॉ. रामकृष्ण डोंगरे, भाऊसाहेब काळुंखे, पी. यु. आरसूड, यशराज इंचाळकर, ॲड. विलास साबळे, प्रा. प्रभाकर खंदारे, ज्ञानेश्वर साळवे, राहुल घोरपडे, नितीन आव्हाड, संतोष शंकरराव पवार, सुनील भानुदास मोटे(अण्णा), सुखदेव खाजेकर, शिवप्रसाद रमेश पुरी, शुभम ताराचंद लभाने, कडूबा विजय जाधव, अनंता भाले, सागर अशोक मोरे, विठ्ठल संजय मोरे, गणेश विजय माळे, वाल्मीक दाभाडे, एल. डी. कदम, अशोक उबाळे, किशोर कांबळे, विश्वदानंद वैराळ, ॲड. प्रेमकुमार लालझरे, हेमंत भगवानराव साळवे, ॲड. अंगद कानडे, बन्सीलाल दादा कांबळे, अमरजीत मुजमुले, परमेश्वर नवगिरे, कबीरानंद गुरुजी, संजय बोदडे, श्रावण हातागळे, अशोक ससाने, काशिनाथ सुलाखे पाटील, अण्णा धागाटे, देविदास गुडेकर, संजय चांदणे , सखाराम रणपिसे, मनोज कसारे, सुधाकर चांदणे, सतीश कावडे, केशव शेकापूरकर, प्रकाश वैराळ, शंकर भाऊ तडाखे, एस. पी. चव्हाण, रामचंद्र दावलवार, डॉ. एच.पी. बोयाळे, कॉम्रेड अंगद भोरे, अशोक पाटोळे, सुभाष आठवले, प्रकाश लोंढे, प्रा. डॉ. बी. एस. वाघमारे, प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, कॉम्रेड गणपत भिसे आदी संघटना प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.