भोकर; भोकर येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालय येथे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न झाला.
सदरील विद्यालयात सध्या वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी साठी शिक्षकांचे 10 दिवसीय प्रशिक्षण संपन्न होत आहे.
सर्व सन्माननीय प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी श्री शिंदे सर, चक्रवार सर, लोखंडे सर, श्री वाठोरे सर, पप्पुलवाड सर, तोटेवाड सर, राठोड सर, श्रीमती गोवंदे मॅडम, कारले मॅडम कांबळे मॅडम, गेडाम मॅडम,आनंद भालेराव, संजय गरुडे,प्रभाकर दासरवार,सुरेश राठोड,दिलीप राठोड आदि उपस्थित होते.