किनवट,दि.२२ : फुले - आंबेडकरी चळवळीतील दलित पॅंथरचे जेष्ठ कार्यकर्ते ॲड.हरिभाऊ दर्शनवाड यांना अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स कडून त्यांच्या आंबेडकरी चळवळीतील योगदानबद्दल 'छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला.हा पुरस्कार छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या औचित्यावर दि. २६ रोजी सिडको, नवीन नांदेड येथील रुबी हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात पँथर नेते रमेशभाऊ खंडागळे यांच्या उपस्थितीत देण्यात येईल.
ॲड.हरिभाऊ दर्शनवाड यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल "सेक्युलर मुव्हमेंट",या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲड.मिलिंद सर्पे, किनवट न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड.किशोर मुनेश्वर, सचिव ॲड.माझ बडगुजर,माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, ॲड. यु.एस.घुले,ॲड.सुभाष राठोड, जिल्हा मजुर सहकारी संघाचे संचालक उत्तम राठोड, सुरेश शेंडे ,आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
------------------------------------------------------•