Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड जिल्हा नियोजन समिती बैठक @जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन


नांदेड: जिल्हा नियोजन समितीची बैठक आज राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री अतुलजी सावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

आजच्या  बैठकीत मी उपस्थित केलेले जिल्हा सामान्य रुग्णालयातील CT स्कॅन सेंटर आणि रुग्णांना होणार नाहक त्रास आणि आर्थिक भुर्दंड, गोदावरी नदी स्वच्छता व नांदेड शहरातून मोठ्या नाल्याद्वारे  सोडण्यात येणारे सांडपाणी , तसेच इतर सदस्यांनी उपस्थित केलेले जलजीवन मिशन पाणीपुरवठा, ग्रामीण भागात वारंवार खंडित होणारा विदुयत पुरवठा, नांदेड जिल्ह्यातील अवैध धंदे, नांदेड जिल्ह्यातील अमली पदार्थ धंदे, घरकुलकरिता रेती उपलब्धता,अतिवृष्टीमुळे झालेले नुकसानीचे पंचनामे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रखडलेले रस्त्याची कामे,नांदेड जिल्ह्यातील सर्वच  हेमाडपंथी मंदिरांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा. यासह अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. या बैठकीला  माझ्यासह आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार भिमराव केराम, खा.अशोक चव्हाण, खा डॉ.अजित गोपछडे, खा प्रा.रविंद्र चव्हाण, खा शिवाजी,कोळगे ,आमदार बाबुराव कदम कोहळीकर, आमदार आनंदराव बोंढारकर,आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापुरकर, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ.राहुल कर्डीले, पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डोईफोडेयांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त