Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मराठवाडा विभागाच्या वतीने “क्या हुआ तेरा वादा?” आंदोलन


किनवट:   शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मराठवाडा विभागाच्या वतीने “क्या हुआ तेरा वादा?” हे आंदोलन शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे ह्यांच्या नेतृत्वाखाली आजपासून सुरु करण्यात आले आहे.  या जनआंदोलनाअंतर्गत पदाधिकाऱ्यांनी किनवट तहसीलदार यांच्या मार्फत राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून निवेदन दिले
.

सत्तेसाठी शेतकऱ्यांना अनेक आमिषे देऊन सत्ता मिळताच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी ५ जून ते १२ जून या कालावधीत संपूर्ण मराठवाड्यात हे आंदोलनात करण्यात येत आहे.


ह्यावेळी उप जिल्हा प्रमुख अनिल रुणवाल ता प्रमुख मारोती दिवसे 

मारोती दिवसे पाटील शिवसेना तालुका प्रमुख ,अतुल दर्शनवाड  युवासेना तालुका प्रमुख,प्रशांत कोरडे , किशोर बोलेनवार,सचिन पाटील इंदल राठोड प्रमोद जाधव शिवम देवकते रवींद्र जाधव सर बजरंग वाडगुरे सचिन सांगवीकर सुमीत पाटील बापूराव वानोळे विकास बोन्तावर प्रशांत खरे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त