Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची धाडसी कारवाई दारुड्या नवऱ्या पायी त्रस्त असलेल्या महिला कडून पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे अभिनंदन

 कुपटी येथे हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त


श्रीक्षेत्र माहूर 

माहूर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ एकेकाळच्या नक्षलग्रस्त असलेल्या मौजे कुपटी येथे नाल्या शेजारी चालत असलेला हातभट्टी दारूचा मोठा अड्डा पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतः धाडसी कारवाई करून 40 हजाराचे हातभट्टी दारू बनवण्याचे रसायन व साहित्य उध्वस्त केल्याची घटना दि 19 रोजी सकाळी 10 वाजता घडली असून हातभट्टी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने  खळबळ उडाली आहे


पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत माहूर तालुक्यातील हातभट्टी दारू विक्री करणारे आणि देशी दारूची चोरट्या मार्गाने अवैधरित्या विक्री करणाऱ्या विरुद्ध  पोलीस निरीक्षक गणेश कराड हे धाडसी कारवाया करत असल्याने हातभट्टी देशी दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून काही ठिकाणी मुजोरी करणाऱ्या दारू विक्रेत्याकडून  हातभट्टी दारू निर्माण करून विक्री करण्याचे प्रमाण सुरू असल्याची माहिती मिळाल्याने अनेक ठिकाणी महिला समोर येत असल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतःहाच धाडसी कारवायाची मोहीम हाती घेतल्याने गोपनीय रित्या चालत असलेले हातभट्टी चे अड्डे उध्वस्त होत असून अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या एकालाही सोडणार नसल्याचे गणेश कराड यांनी सांगितले असून तालुक्यातील दारुड्या नागरिका पायी त्रस्त असलेल्या महिला कडून नुकताच पोलीस निरीक्षक गणेश कराड  यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आला आहे



कूपटी येथील नाल्या शेजारी झालेल्या धाडसी कारवाईत आरोपी रामभाऊ देवराव अंभोरे वय 45 राहणार कुपटी यास मासरेड अंतर्गत जाय मोक्यावर पकडून येथे हातभट्टी दारू बनविण्याचे 600 लिटर मोह फुलाचे व इतर घातक केमिकल टाकलेले रसायन 100 लिटर हातभट्टीची तयार झालेली दारू यासह दारू बनविण्याचे साहित्य नष्ट करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्यासोबत सपोनी संदीप अन्येंबोईनवाड पोहेका गजानन चौधरी ज्ञानेश्वर खंदाडे पवन राऊत चालक सिद्धांत नागरगोजे यांचे सह कर्मचारी उपस्थित होते

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त