नांदेड (प्रतिनिधी) साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त नांदेड येथील डॉ.अण्णाभाऊ साठे चौक येथे सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळ च्या वतीने आयोजित या अभिवादन कार्यक्रमात सकल मातंग समाज, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या सह समाज बांधव, पत्रकार, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.
डॉ.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती दिनानिमित्त १८ जुलै रोजी डॉ. अण्णाभाऊ साठे चौक नांदेड येथील पुतळ्यास सकल मातंग समाजाचे समन्वयक तथा माजी आमदार अविनाश घाटे, जयंती मंडळाचे स्वागताध्यक्ष मा. ऍड. सुरेंद्रजीं घोडजकर, संयोजक गणेश अण्णा तादलापूरकर, जिल्हा जयंती मंडळाचे अध्यक्ष नागेश तादलापूरकर, प्रा. देविदास इंगळे उपाध्यक्ष मारोती चिवळीकर, अंबादास भंडारे, सचिव ईश्वर अण्णा जाधव, रोहन वाघमारे,निलेश तादलापूरकर, भगवान जाधव, सुनिलकुमार मोघेकर, दिगंबर घायाळे, मारोती कांबळे, चंद्रमुनी कांबळे, कपिल कांबळे, किशन इंगळे, सुनील डोईजड, गुणाजी बुजवणे, सोनू वाघमारे, रामा वाघमारे, आकाश गवाले, प्रकाश बोडारकर यांच्यासह लहुजी साळवे कर्मचारी महासंघ, बिसेफ, आदी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.