Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस निरीक्षकाची मटका अड्ड्यावर धाड -पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतः मटका चालविण्याचे ठिकाणावर धाड मारून चौघांना घेतले ताब्यात


माहूर :शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या चहा टपरीवर काही इसम मटका घेत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतः मटका अड्ड्यावर जात धाड टाकून मटका घेण्याचे साहित्यसह रोख रक्कम असे एकूण 4760 हजार रुपयांचे साहित्य जप्त करून चौघांना ताब्यात घेतल्याची घटना दि 24 रोजी 2.45 वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे 


 पोलीस निरीक्षक गणेश कराड हे शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करीत असतांना  गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काही इसम मिलन डे नावाचा मटका जुगार बस स्थानक समोर चहा टपरीवर लोकांकडुन पैसे घेऊन खेळत व खेळवित असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन दोन पंचांना सोबत घेऊन वेळ 2 :45वा. चे सुमारास छापा मारला असता चौघेजण मटका घेताना आढळून आल्याने त्यांना पकडून ठाण्यात आणले त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगंझडतीत खालील प्रमाणे मटका जुगाराचे साहित्य व नगदी मीलन नावाचा मटका जुगाराचे आकडे लिहीलेले डायरी त्यावर मराठीत आकडे लिहीलेले तिन पेन असे 4760 किमतीचा मुद्येमाल त्यांच्या ताब्यात मिळुनआल्याने हे सर्व साहित्य आणि रक्कम जप्त करत चौघांना अटक करण्यात आली आहे 

या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक गणेश कराड सपोनी सपोणी पालसिंग ब्राह्मण सपोनी संदीप अन्येबोईनवाड पोहेका गजानन चौधरी कैलास जाधव पोहेका कैलास जाधव पोहेका पुष्पा पुसणाके पोका पवन राऊत होमगार्ड सहभागी होते

Breaking News

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजय दिवस साजरा.