किनवट:अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष सन्माननीय मेघराज राजे भोसले साहेब यांच्या हस्ते दि. 21/07/2025 सोमवार राजी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ शाखा पुणे येथे "मदिरा" या मराठी चित्रपटाचे पोस्टर अनावरण झाले.यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त "फॅन्ड्री" फेम अभिनेते सोमनाथ अवघडे (जब्या) राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त "पिस्तुल्या" व "सैराट" फेम अभिनेते सूरज पवार,अरबाज शेख व माय यशोदा फिल्म्स अँड एंटरटेनमेंट संपूर्ण टीम उपस्थित होती.
"मदिरा" चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक के. व्हि.यशोदा तातेराव हे नांदेड तालुक्यातील वडवणा या गावचे असून त्यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण मुंबई,पुणे येथील नामांकित संस्थेत घेतले असून त्यांनी या पूर्वी ग्लोबल आडगाव या चित्रपटात प्रोडक्शनसाठी आणि भाऊचा धक्का या मराठी चित्रपटात साह्ययक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
सदरील चित्रपटात सहनिर्माते आर.साळुंके, कार्यकारी निर्माता एस.वाय. मोहिते,गीत आणि संगीत रवींद्र जाधव, सूरज चव्हाण संकलन वेंकटेश कदम, रवींद्र टाक, छायाचित्रण प्रकाश पारडकर,कला दिग्दर्शक किरण गायकवाड,प्रमोद अंभोरे रंगभूषा ऋणीता धर्मेंद्र गोवंदे
चित्रपटात कलाकार सोमनाथ अवघडे,सूरज पवार,अरबाज शेख,शंकर मोहिते,रवी साळुंके,पौर्णिमा सगर,आरती साळुंके, श्रुती देशमुख, ऋषी सोनकांबळे व लक्ष्मीकांत मुंडे यांच्यासह बाल कलाकार विकास मोहिते,यश मोहिते,अर्निशा सागर भुमक,अरव राष्ट्रपाल खंदारे यांच्याही भुमिका आहेत.
या चित्रपटत किनवट चे अभिनेते तथा पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे यांची ही महत्वाची भूमिका असून नांदेड परिसरतील नविन कलाकारांना देखील सदरील चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी असल्याचे लेखक व दिग्दर्शक के.व्हि. यशोदा तातेराव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.