Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकाऱ्यांनी किनवट तालुक्यातील गावांमध्ये भेट देवून पीक नुकसानीची केली पाहणी

 

नांदेड दि. 23 ऑगस्ट:- मागील आठवडयात नांदेड जिल्ह्यात सतत पाऊस व अतिवृष्टी होवून अनेक हेक्टर शेतीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतात पाणी साचल्यामुळे व पैनगंगा नदीच्या पुरामुळे किनवट तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज किनवट तालुक्यातील भंडारवाडी, पिंप्री या गावांना भेट देवून पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.


यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड, नायब तहसिलदार फोले, कृषी विभागाचे अधिकारी, परिसरातील शेतकरी आदींची उपस्थिती होती.  


किनवट तालुक्यात पैनगंगा नदीच्या पुरामुळे नदीकाठच्या गावात पूरपरिस्थिती निर्माण होवून कापूस, सोयाबिन व इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरु असून ते तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. तसेच यावेळी त्यांनी किती टक्के पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे यांचा आढावा घेतला. तसेच सहस्त्रकुंड धबधबा येथे पाहणी करुन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

00000

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा