Ticker

6/recent/ticker-posts

साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे जिल्हा जयंती मंडळाने मानले आभार

 


नांदेड शहरात व सिडको हडको विष्णुपुरी भागात मोटारसायकली चोऱ्यांचे प्रमाण वाढले याचा त्वरित बंदोबस्त करावा असे निवेदन देण्यात आले

Nanded: डॉ. कॉम्रेड अण्णा भाऊ साठे जिल्हा जयंती नांदेड उत्साहात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठे सहकार्य केले. त्यानिमित्ताने नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.अबिनाश कुमार साहेब यांची भेट घेऊन सहकार्याबद्दल जिल्हा जयंती मंडळाने आभार व्यक्त केले. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात व नांदेड परिसरात सिडको हडको विष्णुपुरी व नांदेड शहर मध्ये मोटरसायकली चोरीचे प्रमाण वाढलेले आहे याबाबत  निवेदन देण्यात आले.

 यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे  जिल्हा  सरचिटणीस गणेश अण्णा तादलापूरकर शिवसेना उपशहर प्रमुख ईश्वरअण्णा जाधव, राष्ट्रीय संविधान बचाव अभियान राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.देविदास इंगळे, गोपाळ वाघमारे सुरेश वांगीकर, दर्शन इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Breaking News

संभाजी ब्रिगेडच्या विधानसभा अध्यक्षपदी पांडुरंग बादड संघटक पदी विक्रम पवार प्रसिद्धी प्रमुखपदी आकाश इंगोले यांची निवड