माहूर | गडावर साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवात शिवसेना उबाठा गटाकडून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही माऊली गेस्ट हाऊस समोर महाप्रसादाला महाआरती करून सुरुवात करण्यात आली यावेळी शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा दादा खराटे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख यश दादा खराटे यांचे सह मान्यवर उपस्थित होते
माहूर गडावर नवरात्र उत्सवात गेलेले सर्व भाविक एसटीतून खाली उतरताच माऊली गेस्ट हाऊस समोर शिवसेना उबाठा गटाकडून दरवर्षी सातत्य राखत अकरा दिवसही महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते या महाप्रसादात उसळ दहीभात केळी सफरचंद शिरा या सह इतर पदार्थ भाविकांना वाटप करण्यात येत आहे गडावर चढून दर्शन केल्यानंतर परशुराम मंदिर मार्ग पाचशेपर्यंत चढ उतार करावा लागत असल्याने बस मधून खाली उतरताच त्यांना महाप्रसाद आणि थंड पाण्याचे वाटप होत असल्याने भाविक उबाठा गटाचे जिल्हा अध्यक्ष ज्योतिबा दादा खराटे यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करून आशीर्वाद देताना दिसले
