Ticker

6/recent/ticker-posts

पैगंबर मोहम्मदप्रेम व्यक्त करणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल – संतापाची लाट; किनवटमधून राष्ट्रपतींकडे निवेदन

 


किनवट (प्रतिनिधी):

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे ईद मिलाद-उन-नबीच्या दिवशी काही मुस्लिम तरुणांनी पैगंबर मोहम्मद यांच्या प्रति प्रेम व आदर व्यक्त करण्यासाठी “I Love Mohammad” असा मजकूर असलेले फलक शहरात लावले. परंतु या घटनेवरून स्थानिक पोलिसांनी २५ मुस्लिम तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे देशभरातील मुस्लिम समाजात तीव्र नाराजी आणि संतापाची लाट उसळली आहे.


या पार्श्वभूमीवर किनवट तालुक्यातील मुस्लिम तरुणांनी तीव्र भावना व्यक्त करत, सदर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात किनवट येथील प्रतिनिधी मंडळाने सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर केले.


निवेदनात म्हटले आहे की,


> “पैगंबर मोहम्मद यांच्या नावावर प्रेम व्यक्त करणे हा कुठलाही गुन्हा ठरू शकत नाही. अशा प्रकारच्या कारवायांमुळे देशातील धार्मिक सौहार्द धोक्यात येतो. सरकारने या अन्यायकारक गुन्ह्यांची तत्काळ मागे घेऊन तरुणांना न्याय द्यावा.”


दरम्यान, या घटनेवरून स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावर मुस्लिम समाजात संतापाचे वातावरण असून, न्यायालयीन लढाईसाठीही तयारी सुरू असल्याचे कळते

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा