Ticker

6/recent/ticker-posts

माहूर पोलिसांची तालुक्यात तीन गावात एकाच वेळी धाड- नवरात्रोत्सवापूर्वी मिशन फ्लॅश आऊट अंतर्गत धाडसी दीड हजार लिटर दारू बनविण्याचे रसायन पकडले


श्रीक्षेत्र माहूर

शहरातील गडावर श्री रेणुका माता मंदिरात धार्मिक वातावरण नवरात्रोत्सव पार पडणार असल्याने पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या संकल्पनेतील मिशन फ्लॅश आउट अंतर्गत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कराड अवैध दारू विक्री विरुद्ध सुरुवातीपासूनच धडाकेबाज कारवाया केल्या असून मौजे मेट येथे 700 लिटर मोहफुलाचे रसायन तर मौजे पानोळा येथे 200 लिटर मोहफुलाचे रसायन तसेच कुपटी शिवारात 600 लिटर मोफुलाचे रसायन मोहफुल आणि साहित्य पकडून तिघांवर गुन्हा दाखल करत तिन्ही ठिकाणचे मोहफुल साहित्य रसायन नष्ट केल्याची घटना दि 20 रोजी10 वाजता तिन्ही ठिकाणी एकाच वेळी घडली आहे


वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी तालुक्यातील मौजे मेट पानोळा आणि कुपटी या ठिकाणी हातभट्टी दारू बनविण्यासाठी अवैध दारू विक्रेत्याने साहित्य जमा करून दारू काढण्याचे तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी मौजे मेठ येथे सपोनी शरद घोडके पोउपनि बाबू जाधव पोका दत्ता सोनटक्के सागर डरंगे सोनूताई भुरके यांची टीम तयार करून पाठविले असता जंगलाला लागून असलेल्या शेतातील गोठ्यात दारू विक्रेत्याने 700 लिटर रसायनासह साहित्य आणि मोहफुलाची जुळवाजवळ केलेली दिसून आली सपोनी शरद घोडके यांनी सर्व साहित्य नाल्यात उबडून देत साहित्य जाळून टाकले व एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला तर मौजे पानोळा येथे पोउपनी पालसिंग ब्राह्मण पोहेका गजानन चौधरी पोका बालाजी राठोड सरिकाताई राठोड यांनी टाकलेल्या धाडीत 200 लिटर रसायन आणि साहित्य नष्ट करून एकावर गुन्हा दाखल केला आहे मौजे कुपटी  येथे टाकलेल्या धाडीत सपोनी संदीप अन्येबोईनवाड यांचे सह पोना प्रकाश गेडाम ज्ञानेश्वर खंदाडे संघरत्न सोनसळे शिवनंदाताई जाधव यांचे सह पोलिसांनी गावा शेजारी दारू गाळण्याच्या तयारीत असलेल्या हातभट्टीवर धाड टाकून 600 लिटर रसायन व फुल आणि साहित्य नष्ट करून एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे


 मौजे मेट येथील महिलांनी माहूरच्या पोलीस ठाण्यात येऊन दारू विक्री बंद करावी असे निवेदन दिलेले असल्याने मौजे मेट येथे दारूचा थेंब जरी विक्री झाला तर गाठ माझ्याशी आहे सज्जड दम येथे धाड टाकून सपोनी शरद घोडके यांनी दिला आहे अवैध व्यवसाय विरुद्ध माहूर पोलिसांची धडक मोहीम सुरू असून अवैधरित्या दारू विक्री तसेच दारु काढणाऱ्या वर मिशन फ्लॅश आऊट अंतर्गत कडक कारवाया होणार असून अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद करावे अन्यथा कारवाईसह इतरही जबर कारवाया करण्यात येतील असा इशारा पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिला आहे बी

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा