Ticker

6/recent/ticker-posts

स्वच्छता कर्मचाऱ्यांना टीशर्ट व अप्रॉन वाटप दररोज सकाळी स्वतः हजर राहून नगराध्यक्ष करून घेत आहेत स्वच्छता

 स्वच्छ माहूर सुंदर माहूर साठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचा पुढाकार 


श्रीक्षेत्र माहूर 

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहूर नगरीत भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असताना, नगर पंचायतीने स्वच्छतेला विशेष प्राधान्य दिले आहे. “स्वच्छ माहूर, सुंदर माहूर” ही संकल्पना साकार करण्यासाठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी स्वतः दररोज सकाळी संध्याकाळी हजर राहून स्वच्छता मोहिमेत सहभागी होत शासनाचा उपक्रम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत


शनिवारी, रविवारी आणि ललित पंचमीच्या दिवशी भाविकांचे प्रचंड आगमन होत असल्याने मंदिर परिसर, महामार्ग व टी-पॉईंट या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगराध्यक्ष दोसानी यांनी कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून झाडू हातात घेत स्वच्छतेचा संदेश दिला.या वेळी 100 रोजंदारी स्वच्छता कर्मचाऱ्यांना टीशर्ट तर 30 महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना अप्रॉन वाटप करण्यात आले. या छोट्याशा पण महत्त्वपूर्ण कृतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाची नवी ऊर्जा संचारल्याने गडासह शहर स्वच्छ दिसत आहे



भाविकांच्या सेवेसाठी दिवसरात्र राबणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे कौतुक करत नगराध्यक्ष दोसानी म्हणाले की, “स्वच्छता ही केवळ जबाबदारी नाही तर आपली संस्कृती आणि श्रद्धेचा भाग आहे. भाविकांना निर्मळ, सुंदर माहूर अनुभवायला मिळावा, हीच आमची ध्येयवेड आहे.”नगर पंचायतीच्या या उपक्रमामुळे माहूर नगरीत स्वच्छतेबाबत नवा आदर्श प्रस्थापित झाला असल्याचे मत मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी व्यक्त केले आहे.या वेळी उपनगराध्यक्ष नाना लाड,सभापती विजय कामटकर ,नगरसेवक प्रतिनिधी सुमित खडसे,रफिक सौदागर,इरफान सय्यद,रणधीर पाटील, निसार कुरेशी,राजू सौंदलकर, विक्रम राठोड यांची उपस्थिती होती. भाविक व नागरिकांकडून या कार्याचे भरभरून कौतुक होत आहे.

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा