श्रीक्षेत्र माहूर
नांदेड-गोल्ला गोलेवार यादव समाजातर्फे दरवर्षी घेण्यात येणारा मेळावा, दिनांक 01/10/25 रोजी स्थळ दत्तधाम माहूरगड येथे संपन्न होणार आहे यंदाचा समाज भुषण पुरस्काराचे मानकरी जेष्ठ समाजसेवक श्री. रावसाहेब शिवप्पा राघुमोड,व गंगय्याजी नारायण सल्लावार यांना गोल्ला गोलेवार यादव महासंघ महाराष्ट्र च्यावतीने पुरस्कार देण्यात येत आहे. त्यासोबतच सेवा निवृत्तीचा सन्मान व गुणवंतांचा सत्कार समारोह व व्यसन दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गोल्ला गोलेवार यादव महासंघ मेळाव्यास प्रमुख आयोजक व.भ.प साईनाथ महाराज वसमतकर बितनाळकर,महाराष्ट्र शासन स्वछता धूत तथा आयटीआय उद्योग महाराष्ट्र शासन द्वारे व प्रमुख अतिथी म्हणून किनवटचे आमदार श्री भिमरावजी केराम, हैद्राबादचे चित्रपट दिग्दर्शक व उद्योजक डॉ. रविकिरणजी यादव, श्रीकृष्ण मंदिर बासर येथील श्री भूमानंद महाराज उपस्थित रहणार आहेत. सदरील कार्यक्रमास व्याख्याते प्रा. विठ्ठलराव बरसमवाड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
यादव समाजाच्या वतीने घेण्यात येणारा मेळावा हा समाजाच्या अस्तित्वाचा परंपराचा असुन हा सर्वांनी मिळून मेळावा यशस्वी केला पाहिजे, हा मेळावा म्हणजे गोल्ला गोलेवार यादव समाजाच्या भावी पिढीच्या उज्वल भवितव्याचा आनंद आहे, गोल्ला गोलेवार गोलकर सर्व समाजाने एकत्र सहभागी होवुन यादव समाजाच्या व्यापक हितासाठी, भावी पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे. असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड यांनी केले आहे.
