Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कमठाला येथे पुर्वी मारोती देवकते यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 



किनवट तालुका प्रतिनिधी 

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, कमठाळा येथे आज मंगळवारी छोटेखानी पण आनंददायी वातावरणात पूर्वी मारोती देवकते हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.


पूर्वीचा खरा वाढदिवस रविवार, दिनांक २८ सप्टेंबर रोजी होता. मात्र शाळेला सुट्टी असल्याने दी. 30 सप्टेंबर रोजी  शाळेत सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या उपस्थितीत तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पूर्वी नुकतीच सहा वर्षांची झाल्याने ती शाळेत पहिल्या वर्गात शिकत आहे. शाळेत झालेला हा तिचा पहिलाच वाढदिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते.


या प्रसंगी पूर्वीने विद्यार्थ्यांना व शाळेतील शिक्षकांना पेन भेट देऊन वाढदिवसाचा आनंद वाटला. विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त करून पूर्वीला शुभेच्छा दिल्या.


या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षकवृंद, शिक्षिका, पत्रकार बाबूराव वावळे, सहपत्नि मारोती देवकते, संतोष मासटवार तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते सुनील उईके यांची उपस्थिती लाभली.


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षकांनी केले तर शेवटी उपस्थित मान्यवरांनी पूर्वीला उज्ज्वल शैक्षणिक भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या. शाळेतील वातावरण त्या दिवशी खऱ्या अर्थाने उत्सवी झाले होते.

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा