श्रीक्षेत्र माहूर
माहूर गडावरील आनंद दत्तधाम आश्रम येथे गोल्ला गोलेवार यादव महासंघाचा समाज मेळावा व रावण दहनाचा कार्यक्रम राज्याचे स्वच्छता दूत राष्ट्रसंत गुरुवर्य द भ प श्री साईनाथ महाराज वसमतकर यांचे मार्गदर्शनाखाली व भूमन्ना आक्केमवाड भोसीकर यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या थाटामाटात दी 1 रोजी संपन्न झाला. यावेळी किनवट माहूरचे आमदार भीमराव केराम यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले
या कार्यक्रमात दर वर्षी देण्यात येणारा समाजभुषण पुरस्कार ज्येष्ठ समाज सेवक रावसाहेब शिवप्पा रघुमोड व गंगय्याजी नारायण सल्लावार यांना प्रदान करण्यात आला. व तसेच गुणवंतांचा सन्मान आणि सेवा निवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांचा स्मृति चिन्ह व शाल पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी किनवटचे आमदार भिमरावजी केराम व तेलंगणाचे चित्रपट दिग्दर्शक डॉ. रविकिरणजी यादव यांचे मेळाव्यात येथोचित भाषण पार पडले.
दर वर्षी नवमीच्या दिवशी होणाऱ्या माहूर येथील दसरा मेळाव्यातच समाज मेळावा व समाज भूषण पुरस्कार कार्यक्रम घेण्यात यावा आणि समाजाने हजारोंच्या संख्येने असाच उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन समाजाचे प्रदेश अध्यक्ष भूमन्ना आक्केमवाड भोसीकर यांनी यावेळी केले.
प्रमुख वक्ते प्रा. विठ्ठलराव बरसमवाड यांनी उपस्थित समाज बांधवास व विद्यार्थांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले. तर शेवटच्या सत्रात व्यसन दहन रावण दहन करण्यात आले.
या कार्यक्रमास हभप भूमानंद महाराज निरांजन केशवे, समाजाचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बद्दीवार, प्रदेश उपाध्यक्ष रमेशजी आंबेपवार, प्रदेश कोशाध्यक्ष प्रभाकरराव फांजेवाड, जिल्हा कार्याध्यक्ष रमेशजी रामपूरवार, जिल्हा कोषाध्यक्ष तुकाराम कैलवाड, कर्मचारी प्रदेश सचिव संदेशजी कमठे, मार्गदर्शक डॉ. गंगाधर इंद्रवाड टी. एन. रामनबैनवाड बालाजीराव शेणेवाड दत्तात्रय दुबेवाड, आनंदराव गादीलवाड गोविंदराव दुबेवाड कपिल करेवाड रमेश राऊलवाड विठ्ठलराव जकीलवाड गंगाधरराव सिद्धेवाड माधवराव वटपलवाड देविदास अक्कमवाड, अर्धापूर तालुका अध्यक्ष गंगाधर बकेवाड, उमरी तालुका अध्यक्ष गणेशजी अनेमवाड, भोकर तालुका अध्यक्ष संतोष आक्केमवाड, मुदखेड तालुका अध्यक्ष रामजी गवंडेवाड, हिमायतनगर शहर अध्यक्ष श्याम जक्कलवाड व हजारोंच्या संख्येने समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.पी. जी. रुद्रवाड सर तर उत्कृष्ट सूत्रसंचलन परशुराम अक्कमवाड सर यांनी केले.
