Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी किनवट मंडळ शहराच्या वतीने म.गांधी यांची जयंती व भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

 


किनवट : (प्रतिनीधी) 

      भारतीय जनता पार्टी किनवट मंडळ शहराच्या वतीने म.गांधी यांची जयंती व भारताचे  पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवाडा अंतर्गत आ.भीमराव केराम व महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दुत तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मार्गदर्शक द.भ.प.राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 2 आक्टोंबर रोजी सकाळी 7 वा. हनुमान मंदिर परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक व दसरा मैदान येथे स्वच्छता अभियान व एक पेड मॉं के नाम कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले. 

          यावेळी हनुमान मंदिर परिसर व छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर स्वच्छ करण्यात आला. तिथून पुढे दसरा मैदान  तेथील कचरा साफ करत एक पेड मॉं के नाम अंतर्गत विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला. यावेळी आ. भीमराव केरामांनी पर्यावरण पूरक कार्यक्रम हाती घेण्याचे आवाहन केले. तर महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत राष्ट्रसंत गुरुवर्य साईनाथ महाराज आपल्या मनोगतातून स्वच्छता, शिक्षण व अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सबलीकरण, वृक्षारोपण, पाणी जिरवा पाणी वाचवा, प्रदूषण नियंत्रण, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्मचिंतन, मोफत रक्तदान शिबिर, अध्यात्मिक जीवनाचा उद्धार या दशसुत्री चा संदेश दिलातर  सदर कार्यक्रमाचे आयोजन किनवट मंडळ अध्यक्ष स्वागत आयनेनिवार यांनी केले. 

      दरम्यान व्यंकटराव नेम्मानीवार, राघू मामा, दिनकर  चाडावार, आनंद मच्छेवार, श्रीनिवास नेम्मानीवार, सुधाकर भोयर, सरचिटणीस बाळकृष्ण कदम, व्यंकट नेम्मानीवार, अजय चाडावर, नरेश सिरमनवार, रमेश बद्दीवार, विश्वास कोल्हारिकर, सतिष बिराजदार, उमाकांत कराळे, शिवा आंधळे, जय वर्मा, जगदीश तिरमनवार, राहुल दारगुलवार, सागर पिसारीवर, राजेंद्र भातनासे, नरसिंग तक्कलवार, कृष्णा इटकेपेल्लीवार, कृष्णा कलकुंटलावार, सतिष नेम्मानीवार, संतोष जन्मनवार, गंगुबाई परेकार, उषाताई धात्रक, पुनम दिक्षित, राम शेपुरवार, नरेश सिरमनवार, शिवा क्यातमवार, शुभम कावळे, राजू दासरवार, संतोष मरस्कोल्हे, बंटी फड, विकी दग्गुलवार, माज बडगुजर, सुशील बद्दीवार, अरबाज खान, साहील मेमन यांसह असंख्य कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, महिला आदी मोठय़ा संख्येने उपस्थित. तर  कार्यक्रमाची सांगता आरती करण्यात आली.

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा