Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी दांपत्याने अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिला मदतीचा हात . पत्नीचे सोन्याचे दागिने मोडून 51 हजार रुपयांचा मदत निधी केला तहसीलदाराकडे सुपुर्द.

 श्री दत्तधाम आश्रमाचे मठाधिश राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांनी केला सत्कार. 


श्रीक्षेत्र माहूर 

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना आलेल्या पूरामुळे शेतकऱ्यांची झालेली दुरावस्था पाहून महागाव माताळा येथील अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे यांनी पत्नीचे सोन्याचे दागिने मोडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 51 हजार रुपयांचा मदतनीधी महागाव  तहसीलदारांकडे सुपुर्द करुन समाजासमोर आदर्श निर्माण केल्याने दभप राष्ट्रसंत राज्याचे स्वच्छता दूत साईनाथ महाराज वसमतकर यांनी त्यांचा हृदय सत्कार केला


 श्री दत्तधाम आश्रमाचे मठाधिश महाराष्ट्र शासनाचे ब्रॅण्ड ॲंबेसेडर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मार्गदर्शक राष्ट्रसंत द.भ.प.साईनाध महाराज यांनी आपल्या शिष्यमंडळीला संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी असे आवाहन केले होते.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत केवळ दिड एकर शेती असलेले त्यांचे निस्सीम शिष्य ज्ञानेश्वर शिंदे यांच्या शेतातील पिकही अतिवृष्टीमुळे उध्वस्त झाले होते.परंतु त्याची पर्वा न करता त्यांनी स्वतःच्या उदरनिर्वाहाची चिंता न करता आपल्या पत्नीकडे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची इच्छा व्यक्त केली.असता त्या मायमाउलीने क्षणाचाही विलंब न लावता आपले सोण्याचे दागीने काढून दिले ते मोडून आलेले 51हजार रुपये तहसिलदारा मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले त्याबद्दल त्यांचे श्रीदत्त धाम आश्रमाचे मठाधिश साईनाथ महाराज यांनी दि 7ऑक्टोंबर 2025रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित  कार्यक्रमात हजारो भक्तांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार केला.


 शिंदे दांपत्यानी परिस्थितीची पर्वा न करता संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी समर्पित भावनेने केलेली कामगिरी वाखाणन्या जोगीच असल्याचे गौरवोद्गार काढले त्यांचा आदर्श घेऊन ईतरांनी देखील मुख्यमंत्री सहाय्यता नीधीत यथाशक्ती मदत जमा करावी असे आवाहन याप्रसंगी केले.त्यांनी केलेले कार्य पाहुन उपस्थितांच्या डोळ्यात अश्रु आले होते‌.यावेळी महागावचे तहसीलदार म्हणाले की शिंदे दांपत्याने सामाजिक बांधिलकी जोपासत दाखविलेले औदार्य हे संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण असुन  मनात संवेदनशीलता असेल तर मदतीसाठी सोन्याची नव्हे तर सोन्यासारखी मने पुरेश ठरतात अशा त्यागी दांपत्याची समाजाला गरज असल्याचे सांगून त्यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केलीआहे त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.


या कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचलन शेषेराव पाटील यांनी केले तर आश्रमाचे प्रवक्ते भाउ पाटील हडसणीकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा