Ticker

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संतोष गंधे यांचा हार्दिक सत्कार बीटस्तरीय शिक्षण परिषद संपन्न


श्रीक्षेत्र माहूर

  माहूर तालुक्यातील मौजे गोंडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत बीटस्तरीय शिक्षण परिषद घेण्यात आली या परिषदेला अध्यक्षस्थानी माहूर तालुक्याचे  गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकर तसेच प्रमुख अतिथी म्हणून सिंदखेड पोलीस स्टेशनचे सपोनी रमेश जाधवर व माजी गटशिक्षणाधिकारी रवींद्र जाधव साहेब यांची उपस्थिती होती.

बीटस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये क्रांतीज्योती माता सावित्रीआई फुले राज्यस्तरीय गुरु गौरव पुरस्कार 2025 हा शिक्षण क्षेत्रातील अत्यंत मानाचा पुरस्कार  संतोष शेषराव गंधे यांना प्राप्त झाल्याबद्दल तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा येथोचित सत्कार करण्यात आला 

सर्वप्रथम क्रांतीज्योती माता सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून परिषदेची सुरुवात झाली त्यानंतर विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या मनोगतातून  संतोष गंधे सर यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. त्यांनी गोंडवाडी शाळेच्या अमुलाग्रह बदलामध्ये दिलेले योगदान तसेच नवोदय व शिष्यवृत्तीय परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मिळून दिलेले घवघवीत यश यावर उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला..ल

    विशेष व्याख्याते म्हणून प्रा. तुषार तास्के यांचे व्याख्यान झाले त्यांनी आपल्या व्याख्यानात म्हणाले की सामाजिक बांधिलकी व स्वतःमध्ये असलेला आत्मविश्वास  याच्या जोरावर व्यक्ती असामान्य कार्य करू शकते. माजी गटशिक्षणाधिकारी आर आर जाधव यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की विपरीत परिस्थिती असताना सुद्धा जे शिक्षक उत्कृष्ट कार्य करते ते पुरस्काराचे मानकरी ठरतात. माहूरचे गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या या प्रवासामध्ये त्यांच्या कुटुंबाची साथ असल्याशिवाय हा प्रवास होऊच शकत नाही.

    तसेच गत दोन वर्षात पुरस्कार प्राप्त शिक्षक सुरेंद्र कुडे सर व श्रीमती मीरा परोडवाड मॅडम यांचा देखील सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..

    यावेळी गोंडवाडी ग्राम वासियांची प्रचंड प्रमाणात उपस्थिती होती सदरील शिक्षण परिषदेला  करंजी बीट अंतर्गत करंजी गोंडवडसा सिंदखेड या केंद्रातील सर्वच शिक्षक बांधवांची उपस्थिती होती.. शाळेचा  सुसज्ज व देखना परिसर उपस्थित सर्व मान्यवरांचे लक्ष वेधून घेत होता.  कार्यक्रमाला स्वइच्छेने सारखणी स्तरावरील व्यापारी बांधव पत्रकार बांधव आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. नियोजित वेळेला कार्यक्रम सुरू झाला आणि कार्यक्रमाच्या नंतर लगेच सर्वांना उत्कृष्ट व स्वादिष्ट अशा स्वरुची भोजनाचा आस्वाद  देण्यात आला.

सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सरपंच भास्कर पुरके व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश बावणे व समस्त गोंडवाडी वासीयांनी यशस्वी प्रयत्न केले..

  सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गंधे सर यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन विजय वाघमारे सरांनी मांडले. अत्यंत उत्साह पूर्ण व प्रसन्न वातावरणात खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली.

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा