श्रीक्षेत्र माहूर
माहूर तालुक्यातील रुई-गुंडवळ येथील साठवण तलावाच्या बांधावर मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहेत. तसेच त्यामुळे बांध फुटण्याच्या स्थितीत आहे. शिवाय त्या ठीकांनी वाढलेल्या झाडे झुडपा मुळे साप विंचू व इतर हिंसक वन्य प्राणी त्या ठिकाणी निवास करीत असल्याने शेतकऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांच्या जीवित्वास हानी होण्याची शक्यता आहे. तसेच बांध - फुटल्यास गुंडवळ, गाव व तांडा तसेच रुई गावाचे मोठे नुकसान होइल त्यामुळे बांधावर मोठी झालेली झाडे तात्काळ तोडावीत अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपाचे अनुसूचित जाती आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गजानन किसन कऱ्हाळे यांनी केली आहे
माहूर तालुक्यातील मोठ्या साठवण तलावापैकी एक असलेला मौजे गुंडवळ येथील तलाव गाळाने भरला असून थोडेसे पाणी जरी पडले तर तलाव पूर्ण भरून जातो तसेच अनेक वर्षापासून येथे वाचमन नसल्याने बांधावर मोठाली झाडे उगवली असून या झाडाच्या मुळ्यामुळे बांधावर अनेक ठिकाणी क्रॅक पडले असून तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे लघु पाटबंधारे विभागाकडून तलावाच्या देखरेखीसाठी कुणीही नसल्याने तलावाच्या बांधावरून तयार करण्यात आलेला रस्ता अनेक ठिकाणी दुभंगला आहे
लघु पाटबंधारे विभागाने तात्काळ या बाबीची दखल घेऊन पाहणी करत झाडे तोडून पाणी व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेले कॅनल पूर्ववत सुरू करून येथे वाचण्याची नियुक्ती करावी अशी मागणी उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे गजानन कऱ्हाळे यांनी केली आहे
