Ticker

6/recent/ticker-posts

माकणी येथे राष्ट्रीय पोषण महा अभियान कार्यक्रम संपन्न*

 


प्रतिनिधी / शिरूर ताजबंद

 दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी अंगणवाडी क्रमांक एक माकणी तालुका अहमदपूर येथे राष्ट्रीय पोषण महा अभियान, व पालक मेळावा शिबिर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.सौ. सीमा बबन सूर्यवंशी होत्या.

 प्रमुख पाहुणे तथा उद्घाटक

मा.सौ. वैष्णवी जगन्नाथ व्हडाळे  यांनी उद्घाटन केले. 

या कार्यक्रमात गरोदर माता, स्तनदा माता , 3 ते 6 वयोगटातील माता, अंगणवाडीतील मुले उपस्थित होते.

 कार्यक्रमासाठी गावातील मंडळी व शिरूर बीट अंतर्गत अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.




या कार्यक्रमात गरोदर मातेला बेबी केअर किट चे वाटप करण्यात आले व 0 ते 3 वयोगटातील माताना टी. एच. आर. वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन सौ. इंद्राळे कोंडाबाई वामन मॅडम यांनी केले. 

पोषण महा अभियानाचे महत्त्व, पालक सभा घेण्याचे मुख्य उद्दिष्ट कायआहेत, आपण आपल्या बालकांना कशा प्रकारे घरगुती साहित्यातून त्याच्या बुद्धीला चालना देऊ शकतो तसेच आहारविषयक कुपोषण टाळण्यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे प्रास्ताविकातून सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजक अंगणवाडी कार्यकर्त्या सौ. गुती वी. पी. मॅडम,घोडवाडी अंगणवाडी कार्यकर्त्या व येरमेवाडी मदतनीस सूर्यवंशी भाग्यश्री यांनी केले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. इंद्राळे के. वाय. , सौ राजुरवार सी. पी., सौ.सूर्यवंशी बी. आर., गोदावरी अंकोलगे मदतनीस माकणी यांनी परिश्रम घेतले....

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा