Ticker

6/recent/ticker-posts

मेघराज जाधवचा राज्यस्तरीय पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण झळाळा!

 


माहूर — पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र तर्फे आयोजित १७ वी राज्यस्तरीय पॅरालिम्पिक स्विमिंग चॅम्पियनशिप २०२५-२६ मध्ये माहूरचा जलतरणपटू मेघराज पुनमसिंग जाधव याने शानदार कामगिरी करत सीनियर १०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.या उल्लेखनीय यशामुळे मेघराजची निवड हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी झाली असून माहूर परिसरात सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.


मेघराजच्या या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांचे पालक पूनमसिंग जाधव यांचे अभिनंदन करण्यासाठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, उपनगराध्यक्ष नाना लाड, नगरसेवक रफिक सौदागर, नगरसेवक प्रतिनिधी इरफान सय्यद व अपसर अली आदी मान्यवर उपस्थित होते.मेघराजच्या या सुवर्ण यशाने माहूर शहराचा अभिमान पुन्हा एकदा उंचावला आहे.

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा