आदेशाची उल्लंघन करणारे अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करा
श्रीक्षेत्र माहूर
समितीच्या दौऱ्याच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड मेघना कावली यांनी काढलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवून गैरहजर राहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर वेतन कपातीसह दंडात्मक कारवाई करण्याची मागणी मनसे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे दि 6 रोजी केली आहे
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड सामान्य प्रशासन विभाग जाक्र/जिपना/साप्रवि/आस्था-1/3695/2025, दिनांक. 03/10/2025 च्या आदेशा नुसार 04 ऑक्टोबर 2025 व 05 ऑक्टोबर 2025 रोजी पंचायत समिती कार्यालय सुरु ठेवण्यासंदर्भातील आदेशाचे उल्लंघन करत माहूर पंचायत समिती कार्यालय बंद ठेवण्यासह अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित राहिल्या बद्दल शिस्तभंगासह दोन दिवसाचे वेतन कपात करून दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांनी दिनांक 03/10/2025 रोजी आदेश काढून जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालय चालू ठेवून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिनांक 04/10/2025 (शनिवार) व 05/10/2025 (रविवार) रोजी कार्यालयीन उपस्थिती राखून कार्यालय सुरू ठेवावेत, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते. परंतु प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता असे दिसून आले की, माहूर पंचायत समिती टाळे बंद कार्यालये दिसून आले त्या दिवशी संपूर्ण अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित होते, ज्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाहीसह दोन दिवसाचे वेतन कपात करून दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांनी निवेदनाद्वारे केली आहे
