श्रीक्षेत्र माहूर
शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी यासाठी मौजे सारखंनी येथे दि. 6 रोजी तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी माहूर तालुक्यातील जवळपास सर्वच गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन कर्त्याचे निवेदन सिंदखेड चे सपोनि रमेश जाधव यांनी स्वीकारले
किनवट माहूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी सरकारचा जाहीर निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले जवळपास राष्ट्रीय महामार्गावर सारखणी येथे तीन तास रास्ता रोको करण्यात आला एपीआय रमेश जाधवर यांच्यामार्फत देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन सुद्धा देण्यात आला आहे सोबतच उपोषणास बसलेले मंगेश साबळे यांचे शेतकऱ्यांसाठी जवळपास सात दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे. त्यांचे सुद्धा निवेदन तहसीलदार साहेबांना एपीआय रमेश जाधव यांच्या मार्फत दिले. रस्ता रोकोला अनेक शेतकऱ्यांनी संबोधित केले शेतकऱ्याला एकरी 50 हजार रुपये मदत तात्काळ जाहीर झाली पाहिजे शेतमजूर आहेत त्यांचे घर धान्य साठा वाहून गेले घरे पडझड यामुळे शेतमजूर हवालदिल झालेली आहे. त्यांना सुद्धा 50 हजाराची मदत तात्काळ जाहीर झाली पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी त्वरित होऊन नवीन कर्ज शेतकऱ्याला दुसरे कर्ज उपलब्ध करून द्यावे प्रामुख्याने आंदोलनकर्त्याची हीच मागणी होती
यावेळी त्रिभुवन सिंह ठाकुर शेतकरी संघटना यांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होती. बजरंग वाडगुरे, अमोल आडे ,बालाजी टनमने, मिलिंद कांबळे सारखणी, ईश्वर परेकर शेलू, अरविंद कदम वायफनीकर, शुभम शेंद्रे, बालाजी गायकवाड, अरुण राठोड, रुपेश राठोड ,श्रीकांत कदम, प्रकाश बंडेवार, संजय सूर्यवंशी , ऋषिकेश चौधरी, वामन शेंडे तसेच असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते आयोजक पिंटू आशीर्वाद पाटील यांनी सर्वांचे आभार मानले रास्ता रोको आंदोलन दरम्यान सपोनी रमेश जाधवर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

