ट्रॉमा केअर सेंटर असते तर जीव वाचला असता संतप्त प्रतिक्रिया
श्रीक्षेत्र माहूर
माहूर तालुक्यातील गोंडवडसा येथील दोन तरुण मौजे वझरा येथील शेख फरीद बाबा यांच्या दर्शनासाठी गेले असता दर्शन करून परत येताना त्यांचा दुर्दैवी अपघात झाला या अपघातात आदिल नजीर शेख व 21 वर्ष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आमीन नजीर कुरेशी व 21 हे गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत असून ट्रॉमा केअर सेंटर असते तर यांचा जीव वाचला असता ही प्रतिक्रिया जखमीचे नातेवाईक यांनी दिली आहे
गोंडवडसा येथीलआदिल नजीर शेख व आमीन नजीर कुरेशी हे दोघे दुचाकीवरून शेख फरीद बाबाच्या दर्शनासाठी गेले होते दर्शन आटोपून परत येताना एका तीव्र वळणावर अंदाज चुकल्याने त्यांची दुचाकी रस्त्यावरून घसरून भीषण अपघात झाला या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले घटनेची माहिती आयान रोशन कुरेशी यांनी तात्काळ दूरध्वनीद्वारे घरच्यांना दिली माहिती मिळताच कुटुंबीयांनी दोघांनाही त्वरित माहुर येथील रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला नागपूर येथील रुग्णालयात आदिल नजीर शेख यांच्यावर आयसीयू मध्ये तीन दिवस उपचार सुरू होते मात्र बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने गोंडवडसा परिसरात शोककळा पसरली आहे दरम्यान आमीन यांच्या वर उपचार सुरू आहेत
अनेक वर्षापासून माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर बनवावे अशी मागणी होत असून ट्रॉमा केअर सेंटर असते तर त्यांचा जीव वाचला असता अशी संतप्त आणि तीव्र प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहेत

