कोपरगाव
गेल्या अनेक वर्षापासून लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. रामचंद्र भरांडे सर यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण व्हावे याकरता आंदोलने मोर्चे करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र महाराष्ट्र शासनाकडून लोकस्वराज्य आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीररित्या अटक करण्याचे सत्र सुरू असून महाराष्ट्र सरकारने हे अटक सत्र त्वरित थांबवावे अन्यथा सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही असा इशारा लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे
आपल्या प्रसिद्धी पत्रकात ॲड नितीन पोळ पुढे म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण व्हावे या मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक प्राध्यापक रामचंद्र भरांडे सर यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी मोर्चे आंदोलने करून सरकारकडे मागणी केली जात आहे मागील वर्षी एक ऑगस्ट २०२४ रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उप वर्गीकरण करून आरक्षण लाभ वंचित जातींना लाभ मिळावा असा ऐतिहासिक निकाल दिलेला आहे असे असताना महाराष्ट्र शासनाने निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्य समिती ची स्थापना करून अहवाल सादर करावा असे आदेश दिले मात्र या समिती शासनाकडून जाणीवपूर्वक मुदतवाढ देऊन आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय सातत्याने लांबणीवर टाकण्याचे काम सुरू आहे लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने आझाद मैदान येथे अनुसूचित जातीतील लाभ वंचित मातंग मेहतर चर्मकार ढोर डक्कलवार मादगी आधी जात समूहांना सोबत घेऊन महा एल्गार आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी लाभ वंचित जात समूह आक्रमक झाल्यानंतर देखील सरकारने पोलिसां करवी आंदोलकांना बेकायदेशीर रित्या अटक केली त्याचप्रमाणे नुकतेच लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने आमदार खासदार यांच्या घरासमोर दवंडी आंदोलन केले होते त्यावेळी देखील सदर आंदोलन सरकारने पोलिसाच्या माध्यमातून दडपडण्याचा प्रयत्न केला गेल्या एक महिन्यापासून नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयावर लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र अद्याप कोणत्याही सरकारमधील जबाबदार नेत्याने या आंदोलनाची दखल घेतली नाही. तसेच नुकतेच अर्टी च्या माध्यमातून नांदेड येथे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांना कार्यकर्त्यांनी उपवर्गीकरणाच्या विषयावर प्रश्न विचारले असता देखील पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला.दिवाळीमध्ये नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे भाऊबीज सत्याग्रह करण्यात आला त्यावेळी देखील आंदोलकांना अटक करण्यात आली आज नांदेड जिल्ह्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नियोजित कार्यक्रम असताना सदर कार्यक्रमात जाऊन लोक स्वराज्य आंदोलनाचे कार्यकर्ते उपवर्गीकरणाचा विषय मांडतील या धास्तीने पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. कोपरगाव येथे मागील काही दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्र्यांचा दौऱ्याच्या वेळी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष ॲड नितीन पोळ यांना स्थानबद्ध केले
अशाप्रकारे महाराष्ट्रात विविध ठिकाणी लोक स्वराज्य आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्याचे अटक सत्र सुरू असून अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणावर लोक स्वराज्य आंदोलनाने घेतलेली भूमिका शासनाला कठोर वाटत असेल तर आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय लांबणीवर न टाकता त्वरित मंजूर करावा अन्यथा हे अटक सत्र असेच सुरू राहिल्यास सरकारमधील मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही असा इशारा या प्रसिद्धि पत्रकाद्वारे देण्यात आला आहे
