Ticker

6/recent/ticker-posts

रोषन सायकल टॅक्सी चालकाचा प्रामाणिकपणा. भाविकाची तिन लाख रुपये किंमतीचे दागीण्याची बॅग केली परत.

 


श्रीक्षेत्र माहूर 


 साडेतिन शक्ती पीठापैकी मुळ पीठ असलेल्या तिर्थक्षेत्र माहुर येथे दर्शनासाठी आलेल्या भावाकाची तिन लाख रुपये किंमतीचे दागीण्याची बॅग हरवली होती ती बॅग माहुर येथील सायकल भाड्याने देउन कुटुंबाचा चारितार्थ चालविणाऱ्या रोषण खान महेमूद खान यास सापडली असता ती बॅग माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्याकडे सुपूर्द केली असता कराड यांच्या हस्ते भाविकाला पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या स्वाधीन केली.त्यामुळे रोषणभैय्या यांच्या प्रामाणिक पणाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

 

 दरवर्षी  दिवाळीच्या सुट्टीत लाखो भाविक भक्तियुक्त अंतःकरणाने आई श्री रेणुका मातेला साडी ओटी विडा महानैवैद्य अर्पण करून दर्शन घेण्यासाठी गडावर येत असतात त्यांचे जवळ महिलांचे दागिन्यांसह मौल्यवान वस्तू देखील सोबत घेऊन येत असतात असेच मंठा जिल्हा जालना येथील भाविक  योगेश किशोर राव दाशेळकर हे दि 21ऑक्टोंबर 2025रोजी सहकुटुंब मातेच्या दर्शनासाठी गडावर आले रात्री मातोश्री गेस्ट हाऊस येथे थांबले होते सकाळी दर्शनासाठी जात असताना ते गेस्ट हाऊस समोरच आपली रक्कम दागदागिने  असलेली बॅग विसरले असता त्यांची तिन लाख रुपये किंमतीच्या दागीण्यासह बॅग हरवली असल्याचे कळाल्याने शोधा शोध केली परंतु त्या बॅगेचा शोध लागला नसल्याने भाविक चिंताग्रस्त झाले होते सदर बॅग शहरातील मुस्लिम समाजाच्या सायकल टॅक्सी चालक रोषणभैया यांना सापडली असता क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पोलीस ठाणे गाठून सदर बॅग पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्याकडे सुपूर्द करून जगात माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय दिला.सदर बॅग कांही वेळा नंतर चौकशी करून पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी पोलिस ठाण्यात आलेल्या भाविकांच्या स्वाधीन  केली.  मुस्लिम समाजाचे रोषणभाई यांनी प्रामाणिकपणे दागीण्यासह बॅग परत केली रोषण यांचा प्रामाणीपणा‌ पाहून भाविकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले बॅग परत केल्याबद्दल त्यांनी रोषणभैय्या व पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे आभार मानले.यावेळी पो ना प्रकाश गेडाम, नगरसेवक प्रतिनिधी निसार कुरेशी नारायणजी मेहता रशीद खान हमीद खान सलमान खान खुशाल मेहता अब्दुल भाई एजाज भाई यांचेसह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा