Ticker

6/recent/ticker-posts

अक्षरमुद्रा - दीपावली अंक : २०२५ ॥ अक्षरमुद्रा ॥ संपादक प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार

 


समकालीन जाणिवांचा चिंतनशील आविष्कार.

विशेष मेहनत घेऊन तयार केलेला एक वैशिष्ट्यपूर्ण, आशयसंपन्न, विविधांगी अंक.

या अंकात समीक्षक विचारवंत साहित्यिक दत्ता भगत यांची मुलाखत आहे. तसेच एक प्रवासवर्णन, दोन उद्योगपतींचा परिचय आणि तीन महान सर्जनशील व्यक्तिमत्त्वांची ओळख आहे.

या दिवाळी अंकात सहा ललित लेख आणि दहा कथांचा समावेश आहे. भरगच्च वाचनीय मजकुर,

मधुकर धर्मापुरीकर यांनी व्यंगचित्रांचा आस्वाद तर संतोष घोंगडे यांनी काही रेखाटने काढली आहेत.या रेखाटणांमधून   आशयस्पर्शी भाव उभा केला आहे.

-'मला प्रभावित करून गेलेले पुस्तक' हे या दिवाळी अंकाचे विशेष आकर्षण आहे.  पुस्तक हे मानवी संस्कृतीची अक्षरसंपदा असते. चांगली पुस्तके सर्जनशील आणि होतकरू व्यक्तींचे जीवन घडवीत असतात. अशा सुमारे ऐकोणीस विविध पुस्तकांचा परिचय आणि परामर्श या 'अक्षरमुद्रा' दिवाळी अंकात आढळून येईल,

कोणताही चांगला, संग्राहय दिवाळी अंक ही संपादकांच्या नेतृत्वाखाली साकार झालेली सामूहिक आणि सांस्कृतिक निर्मिती असते. 

डॉ. एस एम कानडजे बुलढाणा

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा