Ticker

6/recent/ticker-posts

श्री रेणुकादेवी महाविद्यालयात ‘कवि संमेलन व शेरो शायरी’ कार्यक्रम संपन्न


श्रीक्षेत्र माहूर 


     बळीराम पाटील मिशन, मांडवी संचलित श्री रेणुकादेवी महाविद्यालय (कनिष्ठ, वरिष्ठ व पदव्युत्तर विभाग – कला, वाणिज्य, विज्ञान व बी.ए. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस), उत्तम राठोड अध्यापक विद्यालय आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र, श्रीक्षेत्र माहूर, जि. नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन साहित्य संमेलन २०२५ अंतर्गत ‘कवि संमेलन व शेरो शायरी’ या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १३ ऑक्टोबर रोजी उत्साहात संपन्न झाले.

     या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रसिद्ध शायर हाजी कादरभाई दोसाणी हे उद्घाटक म्हणून निमंत्रित होते. यांनी एकापेक्षा एक आशयपूर्ण अशा सरस शेरो - शायरी ने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, आनंद आणि चैतन्याचे वातावरण निर्माण केले. त्यांच्या भावस्पर्शी शब्दांनी सभागृहात टाळ्यांचा वारंवार वर्षाव झाला.प्रमुख पाहुणे म्हणून रफिकभाई गाईड व संस्था समन्वयक डॉ तुळशीदास गुरनुले यांची प्रमुख उपस्थिती होती. झोया सय्यद, सानिका वानखेडे, शेख जिशान, सतिष मिराशे, वीरेंद्र राठोड या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे कविता व शेरो शायरी सादर केली. 

     संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटील हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विलास राठोड यांनी तर उपस्थितांचे आभार प्रो. पद्मा मदकुंटे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी प्राध्यापकवृंद, विद्यार्थी, तसेच सांस्कृतिक विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन साहित्य मंडळाच्या वतीने करण्यात आले.

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा