किनवट: मा.आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेत्रत्वावर विश्वास ठेऊन मा. सुनिलभाऊ सोनसळे जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर यांच्या नेत्रात्वामध्ये काल दिनांक 15 /10/25 रोजी असंख्य युवकांनी रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला, तसेंच सर्वानुमते तालुका अध्यक्ष म्हणून संघपाल शेळके यांची निवड करण्यात आली.येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणो नगरपरिषद निवडणुकीत पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याची तयारी मा. जिल्हाध्यक्ष सुनिल सोनसळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दर्शविली तसेच पंचायत समिती गोकुंदा गटा मध्ये तालुक्यात केवळ एकच गोकुंदा अनुसूचित जातीसाठी आरक्षण असल्याने ती जागा शिंदेगट शिवसेना युतीमध्ये माघण्याचं प्रस्ताव देखील त्यांनी वरिष्टांना पाठविला असे सांगितले आणि उमेदवार कोण असेल ती चर्चा तालुका अध्यक्ष संघपाल शेळके यांच्याशी चर्चा करून ती निवडणूक आम्ही ताकदीने लढवू असे सांगितले.
