Ticker

6/recent/ticker-posts

सेवा पंधरवाड्यानिमित्त लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ अपंग आदिवासी विधवा लाभार्थ्यांना मार्गदर्शन


श्रीक्षेत्र माहूर 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर पर्यंत शासनाकडून सेवा पंधरवाडा साजरा केला जात असल्याने या सेवा पंधरवाड्या अंतर्गत नागरिकांना शासनाच्या सर्व योजनांचे लाभ मिळवून देण्याच्या निमित्ताने तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांना लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ दि 15 रोजी कार्यक्रम घेऊन देण्यात आला



यावेळी नायब तहसीलदार कैलास जेठे यांचे सह निरीक्षण अधिकारी निलेश राऊत पुरवठा निरीक्षक गजेन्द्र मिरजगावे पुरवठा लिपिक संतोष पहुरकर रास्त भाव संघटनेचे तालुका अध्यक्ष नागोराव सुर्वे उपाध्यक्ष अशोक राठोड उत्तम राठोड यांचे सह मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित अपंग आदिवासी विधवा निराधार लाभार्थ्यांना अंत्योदय पीएचएच योजनेचा लाभ देण्यात आला



यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना तहसीलदार यांनी सांगितले की आमच्या अपंग विधवा आदिवासी लाभार्थ्यांना अन्नधान्य योजनेचा लाभ मिळत नसेल त्यांनी अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत माहूरच्या तहसील कार्यालयात अर्ज करावा त्यांना तात्काळ लाभ देण्यात येईल असे सांगितले

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा