नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 2 ‘ब’ म्हणजे साठेनगरमधील पाचही उमेदवारांची अधिकृत यादी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून जाहीर करण्यात आली आहे. या यादी आणि चिन्हवाटपानंतर प्रभागातील निवडणुकीचे स्वरूप अधिक स्पष्ट झाले असून स्थानिक सामाजिक रचनेमुळे ही लढत विशेष लक्षवेधी ठरत आहे.
प्रभाग 2 ‘ब’ मध्ये यंदा एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत. अधिकृतपणे मिळालेली चिन्हे पुढीलप्रमाणे—
नरेश पोशराव माहूरकर (अपक्ष) — नारळ
खान अरबाज अहमद खान — पतंग
खान मोहम्मद अली काहेर — गॅस सिलेंडर
पठाण मोहम्मद हसन नूर खान — तुतारी वाजवणारा माणूस
बडगुजर माजोद्दीन शकीलोद्दीन — कमळ
या प्रभागाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे एकूण पाचपैकी चार मुस्लिम उमेदवार, तर एकमेव गैर-मुस्लिम चेहरा म्हणून अपक्ष नरेश माहूरकर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे साठेनगर प्रभागात सामाजिक आणि मतदारसंघातील विविधता या निवडणुकीला वेगळे परिमाण देत आहे.
माज बडगुजर हे भाजपचे अधिकृत उमेदवार असल्याने त्यांना पक्ष संघटनाचा फायदा होईल व मुस्लिम मतदारांची संख्या ह्या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत.
पठाण मोहम्मद हसन नूर खान —हे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून अधीकृत उमेदवार आहेत, पक्ष संघटना व कार्यकर्ते हे त्यांच्यासाठी फायद्याचं ठरतंय.
तर नरेश माहूरकर हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. स्थानिक स्तरावर नरेश माहूरकर हे गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय असल्याने त्या कामाचा उल्लेख नागरिकांमध्ये वारंवार केला जातो. साठेनगर भागातील युवकांशी त्यांचा नियमित संवाद आणि त्यांचे स्थानिक वास्तव्य यामुळे स्थानिक स्तरावर ओळखले जाणारे आणि चर्चेतले नाव बनले आहेत.
तथापि, निवडणूक वातावरणात सर्व पाचही उमेदवारांचे आपल्या पद्धतीने जनसंपर्क सुरू असून प्रभागातील प्रत्येक भागात प्रचाराची चुरस वाढत आहे.
चिन्हांचे वाटप झाल्याने आता सर्व उमेदवारांना मतदारांपर्यंत आपले चिन्ह पोहोचवण्यासाठी काहीच दिवस उपलब्ध आहेत. साठेनगरमध्ये यंदाची लढत स्पर्धात्मक होणार हे निश्चित झाले असून मतदार या पाच उमेदवारांपैकी कोणाला कौल देतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
