शिक्षण सोडून रोडवर छत्री लावून दिवसभर सिम कार्ड विकताना पाहिलय मी एका मुलाला, काय माहित त्याचे स्वप्न काय होती. माणसाच्या आयुष्यात जबाबदारी हे महत्त्वाचे मूल्य आहे, पण कधी तीच जबाबदारी लहान मुलांच्या बालपणावर, त्यांच्या स्वप्नांवर सावली टाकते. शिकण्याच्या वयात अनेक मुलांना हातात पुस्तकांऐवजी कामाची साधन घ्यावी लागतात, ही त्यांची निवड नसून परिस्थितीची जबरदस्ती असते. घर चालवण्यासाठी दारिद्र्याशी दोन हात करण्यासाठी ते लहान वयातच कामाला लागतात. त्यांचं बालपण कुठेतरी धुळीत हरवतं व त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होतो. थोडीशी आर्थिक मदत मिळाली असती, तर त्याच मुलांच्या डोळ्यात चमकणारी स्वप्न वास्तव झाली असती. पण परिस्थितीच अशी असते जगण्याची गरज परिस्थितीपेक्षा मोठी वाटू लागते आणि मग त्यांची स्वप्न मनातच मरून जातात.
जबाबदारी असावी ती आवश्यक आहे, पण ती मुलांच्या आयुष्यातील उजेड हे हेरावून घेणारी नाही.तर त्यांना उज्वल उद्याच्या दिशेने नेणारी असावी.
✍🏻सुहास दत्ता गायकवाड
घोटी. ता. किनवट. जि. नांदेड
मो. 9529230611
