श्रीक्षेत्र माहूर
माहूर गडावर केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी 51 कोटी रुपये देऊन लिफ्ट आणि स्काय वाकच्या कामाला मंजुरी दिली होती त्या अंतर्गत श्री रेणुका मातेच्या पायऱ्या चढताना उजव्या हाताला असलेले लघुव्यवसायिकाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाकडून संभाव्य पार्किंगच्या ठिकाणी गाळे निर्मिती करून त्यांना प्रतिष्ठान रिकामी करण्यात सांगण्यात आल्याने दि 24 रोजी लघु व्यावसायिकांनी तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या उपस्थितीत आपले प्रतिष्ठान रिकामे करण्यास सुरुवात केल्याने लिफ्ट आणि स्काय वॉकच्या कामाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात येणाऱ्या वयोवृद्ध भाविकांना अडीचशे पायऱ्या चढण्या साठी त्रास होत होता सदरील बाबा केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी यांच्या लक्षात आणून दिल्याने त्यांनी भाविकांना सुविधा व्हावी भाविकांचे लवकर दर्शन व्हावे यासाठी 51 कोटी रुपये खर्चाच्या लिफ्ट आणि स्काय वॉकच्या कामाला मंजुरी दिली होती परंतु येथे पायऱ्याच्या शेजारी असलेल्या लघु व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे डाव्या बाजूकडील दरड मध्ये भराव टाकून येथे गाळे निर्मिती करण्यात आली असून त्या ठिकाणी सदरील 35 लघु व्यावसायिकाच्या स्थलांतराचा प्रश्न निकाली काढण्यात आला त्यामुळे काहीं व्यवसायिकांनीआपापले प्रतिष्ठान काढून घेण्यास सुरुवात केलेली असून काही प्रतिष्ठान रिकामे करण्यात आलेले आहेत
सदरील लिफ्ट आणि स्काय वॉक चे काम तसेच व्यवसायिकांचे स्थलांतर व इतर विकास कामे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार नांदेड जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला कार्यकारी अभियंता विशाल चोपडे तसेच श्री रेणुका देवी संस्थान प्रशासन यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजीत जगताप सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता डी के भिसे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्येबोईनवाड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू जाधव क अभियंता पवन हंचाटे सहाय्यक अभियंता प्रफुल कांबळे स्थापत्य अभियंता सहाय्यक संतोष भोकरे विश्वनाथ कांबळे श्री रेणुका देवी संस्थानचे संस्थापक योगेश साबळे गुरुबक्षानि कंट्रक्शन कंपनी यांचे मार्गदर्शनाखाली होत आहे
