Ticker

6/recent/ticker-posts

*स्व.आशीर्वाद पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त वायफनी येथे भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन*

*गरजू नागरिकांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा पिंटू पाटील परिवाराचे आवाहन*

किनवट|


शिवसेना शिंदे गटाचे सक्रिय आणि लोकाभिमुख युवा नेतृत्व पिंटू उर्फ लक्ष्मीकांत पाटील यांचे वडील स्वर्गीय आशीर्वाद साहेबराव पाटील यांचा उद्या दि.१३डिसेंबर शनिवार रोजी ७ वा स्मृती दिन असून त्यांच्या स्मृती दिनानिमित्त रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या सेवाभावी भावनेतून पिंटू पाटील यांनी गोरगरीब रुग्णांना मोफत औषधी व उपचार मिळावे यासाठी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे त्यांच्या मूळ गावी वायफनी आयोजन केले असून माहूर-किनवट तालुक्यातील गरजू नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे असे आवाहन पाटील परिवाराकडून करण्यात आले आहे.

त्याबरोबरच संयुक्तरीत्या भव्य रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून गरजूंसाठी ते जीवनदायी ठरू शकते त्यामुळे इच्छुक रक्त दात्यांनी रक्त दान करून सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी सेवा होत चालली आहे तर व सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य समस्यांवर उपचार करून घेणे परवडत नाही त्यामुळे अनेक रुग्ण आजारपण आपल्या अंगावर काढतात यासाठी सर्वसामान्य नागरिकांची तपासणी व्हावी व आजारपणाचे योग्य निदान होऊन त्यांना मोफत औषधी मिळावी या सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम आम्ही करत आलो आणि करत राहू असे पिंटू उर्फ लक्ष्मीकांत पाटील यांनी आमच्याशी बोलताना सांगितले आहे.

दरम्यान कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.ना.हेमंत भाऊ पाटील,राजश्रीताई हमंतभाऊ पाटील,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अबिनाश कुमार जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब नांदेड,प्रमुख पाहुणे म्हणून श्री विवेक देशमुख शिवसेना जिल्हाप्रमुख शिंदे गट नांदेड,सुदर्शनभाऊ नाईक शिवसेना तालुका प्रमुख माहूर,अभिजीत जगताप तहसीलदार माहूर,किरण भोंडवे उवीपो.अधिकारी माहूर,रमेश जाधवर सपोनी सिंदखेड,श्री फिरोजभाई हाजी कादर दोसानी नगराध्यक्ष न.पं माहूर,विनोद पाटील सूर्यवंशी माहूर,यांच्यासह सर्व शिवसेना युवा सेना शिंदे गट कार्यकर्ते व नेते व पत्रकार बांधवांची उपस्थिती राहणार आहे.

Breaking News

संभाजी ब्रिगेडच्या विधानसभा अध्यक्षपदी पांडुरंग बादड संघटक पदी विक्रम पवार प्रसिद्धी प्रमुखपदी आकाश इंगोले यांची निवड