Ticker

6/recent/ticker-posts

बिबट्या आणि अस्वलापासून बचावासाठी किनवट वनविभागाच्या नागरिकांना महत्त्वाच्या सूचना!

 




किनवट (प्रतिनिधी): किनवट वन विभागाने बिबट्या आणि अस्वल आढळणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वन हद्दीला लागून असलेल्या गावांमध्ये मार्गदर्शक सूचना फलक लावून आणि प्रत्यक्ष माहिती देऊन नागरिकांना या वन्यप्राण्यांशी होणारे संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. नागरिकांनी या सूचनांचे पालन करून स्वतःचे तसेच पाळीव प्राण्यांचे संरक्षण करावे, असे आवाहन नांदेडचे उपवन संरक्षक केशन वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक के पी चव्हाण आणि वन परिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड यांनी केले आहे.




​⚠️ नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना:

​वन विभागाने नागरिकांना वन्यप्राण्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत:

​शौचासाठी रात्री बाहेर पडणे टाळावे.

​झोपताना घराचा दरवाजा लावून झोपावे.

​जंगलात कामगार, शेतकरी आणि गुरे चारणारे यांनी एकटे न जाता दोन-तीन लोकांनी एकत्र जावे.

​लहान मुलांना पाळणाघरात किंवा घरामध्ये सुरक्षित ठेवावे.

​जंगलात लघु वन उत्पादने गोळा करताना एकत्र जावे.

​साळींदर, ससे, डुक्कर, कोल्हे ह्या बिबट्याच्या भक्षांची शिकार करू नका, ज्यामुळे बिबट्या मानवी वस्तीकडे आकर्षित होणार नाही.

​बिबट्या किंवा अस्वल यांचे दर्शन झाल्यास आरडाओरडा करू नका.

​जंगलात जाताना नेहमी मोबाईलचा हॉर्न वाजवत किंवा गाणी ऐकत जावे, जेणेकरून वन्यप्राण्यांना मानवी उपस्थितीची जाणीव होईल.

​पहाटे ५ वाजेपूर्वी व सायंकाळी ७ नंतर जंगलात जाणे टाळावे.

​रात्रीच्या वेळी पाळीव प्राणी घरात सुरक्षित ठेवा.

​शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतीची कामे करू नका.

​पाळीव प्राण्यांना जंगलाजवळ घेऊन जाऊ नका.

​बिबट्या पाण्याच्या सोयीसाठी असलेल्या ठिकाणी येत असल्याने, जंगलात पाण्याच्या सोयी असलेल्या ठिकाणी जाणे टाळा.

​प्राण्यांवर हल्ला झाल्यास वनविभागाला तातडीने संपर्क साधा.

​🛑 अचानक बिबट्या/अस्वल दिसल्यास काय करावे?

​वनविभागाने बिबट्या किंवा अस्वल अचानक समोर आल्यास घाबरून न जाण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला आहे:

​अजिबात घाबरू नका. जागेवर उभे रहा.

​दोन्ही हात वर उचला आणि जोरजोरात ओरडा.

​असे केल्याने बिबट्याला तुमची आकृती मोठी प्राणी असल्याचा भास होईल.

​बिबट्या लगेच उलट्या पावलाने ओरडेल व हळूहळू मागे वळून परत जाईल.

​बिबट्या दूर असल्यास हळूच चालत परत जावे.

​अपील: वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, बिबट्या व इतर वन्य हिंस्त्र प्राणी आढळल्यास स्थानिक वनकर्मचारी किंवा अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधावा.

Breaking News

संभाजी ब्रिगेडच्या विधानसभा अध्यक्षपदी पांडुरंग बादड संघटक पदी विक्रम पवार प्रसिद्धी प्रमुखपदी आकाश इंगोले यांची निवड