नांदेड
नांदेड जिल्हा आर्चरी असोसिएशन व गुरुद्वारा बोर्ड संचलित सचखंड पब्लिक स्कूल नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने "हिंद -दी चादर" श्री गुरु तेगबहादूर साहेबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमला समर्पित शिबिराचे मुख्य आयोजक, आर्चरी जिल्हा संघटना उपाध्यक्ष हरजिंदर सिंघ संधू व सचिव तथा मुख्य प्रशिक्षिका वृषालीतई पाटील जोगदंड यांच्या संकल्पनेतून सचखंड पब्लिक स्कूल नांदेड येथे पंधरा दिवसाचे मोफत धनुर्विद्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
5 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2025 दरम्यान गुरुद्वारा बोर्ड संचलीत सचखंड पब्लिक स्कूल नांदेड येथे गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ . विजय सतवीरसिंघ ( रिटा. आयएएस) गुरुद्वारा बोर्डाचे सुप्रीडेंड हरजित सिघ कडेवाले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराचे उद्घाटन सचखंड पब्लिक स्कूलच्या प्राचार्य अनिल कौर खालसा , नांदेड जिल्हा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष इंजी. हरजींदर सिंघ संधू संघटना ,सचिव तथा जिल्हा मुख्य प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड ,अँड विजयेंद्र सिंघ रागी,शिवकुमार काळे, यांनी केले याप्रसंगी रणदीप कौर बैस, रणदीप सिंघ पिरांगे ,प्रेमजीत सिंघ गाडीवाले , छत्तर सिंघ टंक , करणपाल सिंघ लोणीवाले,भागींदर सिंघ फौजी, गुरुजीत कौर पट्टा , अमृत कौर कोटीतीर्थवाले , हरप्रीत कौर छत्ता , हरजिंदर कौर शाहू , जसप्रीतकौर बेदी , गुरप्रीत कौर संधू , जगतारकौर कोल्हापुरे यांची उपस्थिती होती .
सदरील प्रशिक्षण शिबिरात शाळेतील मुले व मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला शाळेतील विद्यार्थ्यांसमोर राज्य राष्ट्रीय पदक विजेत्या धनुर्धधारांनी प्रात्यक्षिक सादर करून खेळाडूंसह प्रमुख पाहुण्यांची मने जिंकली . यावेळी बोलताना प्राचार्य अनिल कौर खालसा यांनी खेळाचे महत्व पटवून देत धनुर्विद्या प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले .
तसेच प्रशिक्षण समारोप प्रसंगी जिल्हास्तर स्पर्धा आयोजित करून विजेत्या खेळाडूंना बक्षीस देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील क्रीडा शिक्षक , शिक्षिका राष्ट्रीय खेळाडू अथर्व जोंधळे , स्वयं कांबळे , सानवी दुर्गे ,श्रेया कांचनगिरे, प्रतीक फाजगे , अजिंक्य फाजगे , सिद्धांत सावंत , कृष्णा यादव , संस्कृती आरसुळे , आर्वी सावंत , वीरेंद्र रॉय , यांनी मेहनत घेतली . सदरील प्रशिक्षण शिबिर पुढील पंधरा दिवस चालणार असून भविष्यात जिल्ह्यासह राज्याला उत्कृष्ट खेळाडू मिळावेत म्हणून हा संकल्प राबविला असल्याचे मुख्य आयोजक व जिल्हा उपाध्यक्ष हरजिंदर सिंघ संधू यावेळी म्हणाले
