मुखेड:--
मुखेड तालुक्यातील होंडाळा येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या
अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.या बैठकिस प्रमुख उपस्थिती मराठवाडा प्रमुख मा.सुधाकरराव पिलगुंडे,मुखेड ता अध्यक्ष शेख मगदुम, देगलुर ता.सदस्य गंगाधर जिरंगे, बाबुराव पवार, मनोहरराव येरपुरवाड शिवाहार घोडके,गणपत गौंड , वंचित चे तुकाराम गायकवाड,इ.मान्यवर ऊपस्थित होते.
प्रथम मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रस्ताविक मुदखेड ता.अध्यक्ष शेख मगदुम यांनी दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या चळवळीमुळे आज दिव्यांगाना गाव पातळीवर सवलती मिळत आहेत. तरीआपण संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय काहि मिळत नसल्यामुळे सर्वांनी सहभागी व्हावे असे आव्हान केले.
प्रमुख पाहुणे दिव्यांग संघटनेचे मराठवाडा प्रमुख सुधाकरराव पिलगुंडे यांनी दिव्यांगाना न्याय हक्क मिळावा म्हणून गाव तिथे शाखा स्थापन करण्याचे आव्हान संघटनेच्या वतीने केल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकशे नव्हद शाखा बोर्डाचे अनावरण करण्यात आले.जोपर्यत आपण हक्काच्या लढाईत सहभागी होण्याचे आव्हान पिलगुंडे यांनी केले
संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी खासदार, आमदार, प्रशासकिय अधिकारी यांना जागे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनामुळे आपणास हक्क मिळत आहे म्हणून आपण संघटितपणे संघर्षात सहभागी होउन आपल्या हक्कासाठी जागे होने काळाची गरज असल्यामुळे आपण अशा मेळाव्यात सहभागी झाल्याशिवाय सवलतीची माहिती मिळत नसल्यामुळे प्रत्येक गावात दिव्यांग संघटनेची माहिती मिळावी म्हणून गाव तिथे शाखा मेळावा झाला पाहिजे.
दिव्यांग वृध्द निराधार बांधवांना न्याय हक्क मिळावा म्हणून आतापर्यंत दोनशे पंच्याहत्तर आंदोलन, सदनिर मार्गाने करून शासन प्रशासन जागे करण्यासाठी प्रयत्न केले व नांदेड जिल्हातील गाव तिथै दिव्यांग संघटनेच्या बोर्ड अनावरण आज एकशे नव्हद शाखेचे अनावरण आपल्या सर्वांच्या संघटितपणे संघर्षात होत आहे.
शाखा बोर्ड अनावरण का करावे लागते त्यांचे उदाहरण असे कि दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र हि शाखा गावात असेल तर येणाऱ्या अधिकारी, लोकप्रतिनिधीला दिनदुबळ्याची आठवण व्हावी त्यांचा हक्काचा निधीची चोरी होऊ नये तसेच निवडणुकीत लोकप्रतिनिधी तरुण मुलांना त्यांच्या पक्षाचे नाव उमेदवाराचे फोटो असलेले टि शर्ट वाटप किंव्हा महिलांना साडी वाटप,कॉलेन्डर,छत्र्याचे मतदाराना वाटप करतात तसेच या लोकप्रतिनिधी दिव्यांग वयोवृध्दाना एखादे साहित्य देण्याची वृत्ती निर्माण व्हावी व गावातील जनतेला दिव्यांगाना व्यंगावर बोलण्याची हिंमत होऊ नये जसे पुर्वा दिव्यांगाना अपंग,आंधळा,पांगळा खुळा म्हणत होते आता असे म्हणेल त्यांना दिव्यांग कायदा कलम ९२ प्रमाणे गुन्हा नोंद होऊन त्यांना तिनं महिने जमानत होत नाहि पण हि जागृती दिव्यांग व जनतेत व्हावी म्हणून गाव तिथे शाखा बोर्ड अनावरण नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात करुन दिव्यांग हक्काच्या सवलतीची माहिती व्हावी म्हणून जास्तीत जास्त दिव्यांग वृध्द निराधार बांधवांनी आपल्या हक्कासाठी संघटितपणे संघर्षात सहभागी व्हावे असे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांनी केले
या मेळ्यात,शाहिर बाबुराव विभुते,केशव सोनटक्के, विठ्ठल तमलुरे, बापुराव सोनटक्के, भगवान थोटे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
प्रसिध्दी पत्रक मनोहरराव येरपुरवाड यांनी दिले

